0
तो म्हणाला, मी जात आहे, बाय-बाय, मला माफ करा.

औरंगाबाद- महाविद्यालयातून घरी परत येताच खोलीत जाऊन पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना उस्मानपुऱ्यातील कबीरनगरमध्ये २१ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसहा वाजता घडली. रोहित विलास वाहूळ (१८) असे त्याचे नाव असून आत्महत्येपूर्वी त्याने जवळचे मित्र, वडील व भावाला मी जात आहे, बाय-बाय, मला माफ करा, असा मेसेज केला होता.

रोहित पॉलिटेक्निकच्या तृतीय वर्षात शिकत होता. २१ डिसेंबर रोजी सायंकाळच्या सुमारास तो महाविद्यालयातून घरी आला. त्यानंतर आतील खोलीत जाऊन त्याने गळफास घेतला. त्याचे वडील घरी आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. त्याला घाटी रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. त्याने आत्महत्येपूर्वी मेसेज केला होता. परंतु त्यात कुठलेही कारण नमूद केले नव्हते. उस्मानपुरा पोलिस ठाण्यात याची नोंद करण्यात आली असून त्याच्या आत्महत्येच्या कारणाचा तपास सुरू असल्याचे सहायक फौजदार व्ही. व्ही. कुतूर यांनी सांगितले.
Suicide case in Aurangabad

Post a Comment

 
Top