0
2 हजार वर्षात फक्त 6 वेळा दिसली ही मकडी

बीजिंग. चीनमध्ये एक शेतकरी शेतात खोदकाम करत होता. तेव्हा त्याला मातीमध्ये एक विचित्र वस्तू दिसली. शेतक-याला वाटले की, त्याच्या हातात तावीज मिळाली आहे. त्याने या वस्तूला स्पर्श केला तर त्याला हालचाल जाणवली. तो शेतकरी खुप घाबरला. हा कोणता जीव आहे हे त्याला कळाला नाही. पण एक्सपर्ट्सने सत्य सांगितल्यानंतर तो हैराण झाला. एक्सपर्ट म्हणाले की, ही जगातील सर्वात दुर्मिळ मकडी (कोळी) आहे. ही शेकडो वर्षांपुर्वी धरतीवर निर्माण झाली होती.

- साउथच्या वेस्ट चीनच्या गावात मिळालेली ही मकडी प्राचीन काळातील आहे असे बोलले जातेय. हा जीव कोणता आहे हे एक्सपर्टलाही कळत नव्हते. पण नंतर कळाले की, ही चीनी आरग्लास स्पायडर आहे. आरग्लास म्हणजे रेतघडी. एक्सपर्ट्स म्हणाले की, या मकडीचे नाव तिच्या दिसण्यामुळे पडले आहे. मकडीच्या समोरचा भाग पुर्णपणें रेतघडीप्रमाणे असतो. यामुळे तिला हे नाव देण्यात आले.

2 हजार वर्षात फक्त 6 वेळा दिसली ही मकडी
- चीनी मीडिया रिपोर्ट्सनुसार ही मकडी खुप रेअर होती, गेल्या 2 हजार वर्षात ही मकडी फक्त 6 वेळा दिसली. एक्सपर्ट म्हणाले की, विज्ञानात या मकडीला खुप महत्त्व आहे. या मकडीवरुन या प्रजातीविषयी अजून माहिती काढली जाऊ शकते.

मिळू शकते चांगली किंमत
शेकतरी जियो ली याला सांगण्यात आले की, या मकडीला कोणताही वैज्ञानिक किंवा म्यूझियम सहज खरेदी करु शकते. यानंतर त्याने ही मकडी मोठ्या किंमतीत विकण्याचा निर्णय घेतला. मकडी (कोळी)च्या जानकाराने सांगितले की, ही मकडी लाखोंच्या किंमतीत विकली जाऊ शकते. शेतकरी म्हणाला, "माझ्या शेतात मिळालेली ही मकडी माझे भाग्य उजवळण्यासाठी आली आहे. जोपर्यंत मला याची चांगली किंमत मिळत नाही, मी मकडीला पाळीव प्राण्यांप्रमाणे सांभाळेल."
Farmer Was Didding Something in His Farm When, People Told It Was a Rarest Spider

Post a Comment

 
Top