0
गुन्हेगारांचे ऑपरेशन २० वाहनांद्वारे ९४ पोलिसअधिकारी-कर्मचाऱ्यांची रात्रभर गस्त, नाकेबंदी करून संशयित १७ वाहनांची तपासणी

जालना/शहागड- दिवसेंदिवस गुन्हेगारी वाढत चालली असून अनेक गुन्ह्यांतील आरोपीही फरार आहेत. या आरोपींना ताब्यात घेण्यासाठी जालना, औरंगाबाद, बीड या पोलिसांनी गुरुवारी रात्री कोम्बिंग ऑपरेशन राबवले. यात ३१ जणांची तपासणी करत असताना हरणांचीही शिकार करणारे दोन जण पोलिसांच्या गळाला लागले. या ऑपरेशन रम्यान अनेक गुन्हेगार हे झाडाझुडपात झोपाळे करून राहत असल्याचे पथकांच्या निदर्शनास आले.


विशेष पोलिस महानिरीक्षक प्रकाश मृत्याल यांच्या आदेशानुसार वारंवार ही मोहीम राबवली जाते. दरम्यान, जालना, बीड, औरंगाबाद या तिन्ही जिल्ह्यात गुन्हे करून आरोपी वडीगोद्री, शहागड या परिसरात राहतात. यामुळे तिन्ही जिल्ह्यांतील आरोपी हे ताब्यात घेण्यासाठी या परिसरात वारंवार मोहीम राबवली जाते.

दरम्यान, गुरुवारी रात्री राबवण्यात आलेल्या मोहिमेत ऑपरेशनमध्ये काळविटाची चार शिंगे, एक एलसीडी, ३१ संशयित आरोपींची तपासणी करण्यात आली. तसेच एका आरोपीच्या घरी चोरीचे दागिनेही आढळून आले आहे. गेल्या काही दिवसांपासून अंबड, गेवराई, पाचोड या परिसरात गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. यामुळे पोलिसांनी ही मोहीम राबवून गुन्हेगारांना ताब्यात घेण्यासाठी हा प्रयत्न केला.

जालना, बीड,औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी हे ऑपरेशन राबवले. ही कारवाई पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, अपर पोलिस अधीक्षक समाधान पवार यांच्या मार्गदर्शनाखाली डीवायएसपी चंपालाल शेवगण, भोसले, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, पोलिस निरीक्षक अनिरुद्ध नांदेडकर, अनिल परजणे, हनुमंत वारे यांच्यासह इतर जिल्ह्यांतील अधिकाऱ्यांनी ही कारवाई केली.

२६ वस्त्या तपासल्या
या कोम्बिंग ऑपरेशनसाठी तुकड्या करण्यात आल्या होत्या. जालना, बीड, औरंगाबाद जिल्ह्यातील रेकॉर्डवरील आरोपींच्या २६ वस्त्या तपासण्यात आल्या. हिस्ट्रीशिटर, फरारी, रेकॉर्डवरील घरफोडी करणारे, एबीडब्ल्यू वॉरन्ट, बीडब्ल्यू वॉरन्ट असलेल्यांची तपासणी केली.
मोहीम वारंवार राबवणार : जिल्ह्यातील गुन्हेगारी कमी करण्यासाठी तसेच गुन्हेगारांवर वचक निर्माण करण्यासाठी कोम्बिंग ऑपरेशन ही मोहीम वारंवार राबवण्यात येणार आहे. एस. चैतन्य, पोलिस अधीक्षक, जालना.

८२ पथके
जिल्ह्यात कोम्बिंग ऑपरेशन करण्यासाठी तीन जिल्ह्यांतील १२ पोलिस अधिकारी, ८२ कर्मचारी, २० वाहनांव्दारे रात्रभर हे ऑपरेशन सुरु होते. यात नाकाबंदी करुन १७ वाहनेही तपासण्यात आली आहेत.

का कारवाई?
जालना जिल्ह्यात चालू वर्षात तब्बल साडेपाच हजारांच्या जवळपास गुन्हे घडले आहेत. यात बहुतांशी गुन्ह्यांतील आरोपी हे फरार आहेत. आगामी काळात गुन्हे होऊ नये, तसेच पोलिसांचा गुन्हेगारांवर वचक राहावा, म्हणून ही कारवाई वारंवार राबविली जाते.
Sixth Combing in the year of Jalna, Aurangabad and Beed from police

Post a Comment

 
Top