चीन जगातील सर्वात मोठा स्मार्टफोनचा बाजार आहे. अमेरिका आणि युरोपनंतर आयफोनची सर्वाधिक विक्री चीनमध्येच होते.
बीजिंग - अॅपलने चीनच्या न्यायालयाकडे आयफोनच्या विक्रीवर लावण्यात आलेल्या बंदीवर पुनर्विचार करण्याचा आग्रह केला आहे. क्वालकॉमच्या याचिकेवर फुजियानच्या न्यायालयाने सोमवारी ही निर्णय दिला होता. वास्तविक अॅपलचे सर्व मॉडेल सध्या चीनमध्ये विक्री होत असल्याचेही अॅपलने म्हटले आहे. न्यायालयाच्या या निर्णयाचा विक्रीवर नेमका काय परिणाम होईल, ते अद्याप स्पष्ट नाही. आयफोनच्या विक्रीवर बंदी घालणे जवळपास अशक्यच असल्याचे चीनमधील पेटंटसंदर्भातील वकिलांनी म्हटले आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी सांगितले.
चीन जगातील सर्वात मोठा स्मार्टफोनचा बाजार आहे. अमेरिका आणि युरोपनंतर आयफोनची सर्वाधिक विक्री चीनमध्येच होते. सप्टेंबर तिमाहीमध्ये चीनमध्ये १८ टक्के विक्री आयफोनची झाली होती. असे असले तरी नवीन आयफोन महागडे असल्याने चीनमध्ये त्यांची बाजार भागीदारी ७.२ टक्क्यांवरून कमी होऊन ६.७ टक्क्यांवर आली आहे. संशोधक संस्था आयडीसीनुसार बंदी लागू झाली तर चीनमध्ये ९४० डॉलर (६६,००० रुपये) पेक्षा कमी किमतीचे आयफोन मिळणार नाहीत. क्वालकॉम मोबाइल फोनची चिप बनवणारी जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. ही कंपनी श्याओमी, ओप्पो, व्हीव्ही आणि वन प्लससारख्या ब्रँडला चिपची विक्री करते.
'आयफोन-एक्स-एस' वर बंदी नाही
बंदी लागू होणाऱ्या फोनमध्ये आयफोन-६-एस, ६-एस-प्लस, आयफोन-७, ७-प्लस, आयफोन-८, ८-प्लस आणि आयफोन-एक्स यांचा समावेश आहे. चीनमध्ये आयफोनच्या विक्रीमध्ये सुमारे १५ टक्के भागीदारी याच फोनची आहे. आयफोन-एक्स-एस, आयफोन-एक्स-एस-प्लस आणि आयफोन-एक्स-आर यांच्यावर बंदी नाही. वास्तविक क्वालकॉमने ही याचिका दाखल केली, त्या वेळी हे फोन बाजारात नव्हते. त्यामुळे या फोनचा या बंदीमध्ये समावेश करण्यात आलेला नाही.
फोटो एडिट आणि अॅप मॅनेजमेंटसंदर्भातील पेटंट
अॅपल आणि क्वालकॉम, दोन्ही अमेरिकी कंपन्या आहेत. क्वालकॉमने पेटंटचे उल्लंघन केल्याचा आरोप करत गेल्या वर्षी चीनमध्ये याचिका दाखल केली होती. हे पेटंट फोटो एडिट करणे आणि टचस्क्रीनवर अॅप मॅनेज करण्यासंदर्भातील आहे. अॅपलने हा दावा फेटाळला आहे. क्वालकॉमच्या अवैध कार्यपद्धतीची जगातील अनेक नियामकांच्या वतीने चौकशी सुरू असल्याचे अॅपलने म्हटले आहे. या पेटंटच्या दाव्याला आंतरराष्ट्रीय न्यायालयानेही फेटाळले आहे.

Post a Comment