0
मुंबई - मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून आपल्या प्राणाचे बलिदान देणाऱ्या तरुणांच्या घरातील एका नातेवाइकास एसटी खात्यामध्ये नोकरी देणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी शनिवारी आपल्या निवासस्थानी केली. दोन दिवसांपूर्वी आझाद मैदान येथे उपोषणास बसलेल्या मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या आयोजकांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबीयास सरकारी नोकरी मिळावी, अशी मागणी केली होती. या पार्श्वभूमीवर परिवहन मंत्र्यांनी ही घोषणा केली.
मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून मूक मोर्चे काढण्यात आले. तसेच या आंदोलनात जवळजवळ ४२ तरुणांनी जीवन संपवले हाेते. या तरुणांनी ज्या मराठा आरक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली ते आरक्षण अखेर सरकारने जाहीर केले आणि १ डिसेंबरपासून तो कायदाही लागू झाला. या मोर्चांना आलेले हे यश ठरले. राज्य सरकारने मराठा समाजासाठी १६ टक्के आरक्षण दिले आहे. मात्र, आरक्षणाव्यतिरिक्त अन्य मागण्यांसाठी मराठा क्रांती मोर्चाचे आझाद मैदानावर आंदोलन सुरू होते.

मराठा आंदोलकांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे त्वरित मागे घेण्यात यावेत, या मागणीसह आंदोलन काळात ज्या तरुणांनी बलिदान दिले त्यांच्या कुटुंबीयांना मदत जाहीर करावी, अशी आंदोलकांची एक प्रमुख मागणी होती. आझाद मैदानावरील आंदोलकांनी आरक्षण जाहीर झाल्यावर आंदोलन मागे घ्यावे म्हणून अखेर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मध्यस्थी केली आणि हे आंदोलन मागे घेण्यात आले. ज्या तरुणांनी जीवन संपवले त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीस सरकारी नोकरी देण्यात यावी, ही मागणी उद्धव ठाकरे यांच्याकडे करण्यात आल्यावर त्यांनी याबाबत स्पष्ट आश्वासन दिले होते. यानुसार, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी तत्काळ ही घोषणा केली.

मुख्यमंत्र्यांच्या घोषणेनंतर रावतेंनी दुसऱ्याच दिवशी केली घोषणा
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही नोकरीतील आरक्षण त्वरित सुरू करणार असल्याची घोषणा हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी शुक्रवारी विधिमंडळात केली होती. रावते यांनी शनिवारी सायंकाळी तातडीने पत्रकार परिषद घेऊन बलिदान दिलेल्या तरुणांच्या कुटुंबीयांना मदतीचा हात पुढे करत अशा तरुणांच्या कुटुंबीयांपैकी एकाला एसटी महामंडळात नोकरी दिली जाणार असल्याचे जाहीर केले.

कायगाव टोका येथे आंदोलन काळात घडली पहिली घटना
मराठा आंदोलनाला सुरुवात झाल्यानंतर औरंगाबादमधील कायगाव टोका येथे काकासाहेब शिंदे नावाच्या तरुणाने गोदावरी नदीत उडी घेऊन आत्महत्या केली होती. त्यानंतर राज्यात ठिकठिकाणी ४२ मराठा तरुणांनी आत्महत्या केली होती. या सर्व तरुणांच्या कुटुंबीयांना राज्य सरकारने दिलासा देत शासकीय नोकरी देऊ केली आहेjob in st mahamandal for one of the suicidal families, maratha reservation

Post a Comment

 
Top