गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात असलेल्या गीर अभयारण्याजवळील रेल्वेमार्गावर मालगाडीखाली सापडून तीन सिंहांचा मृत्यू झाला.
अहमदाबाद- गुजरातच्या अमरेली जिल्ह्यात असलेल्या गीर अभयारण्याजवळील रेल्वेमार्गावर मालगाडीखाली सापडून तीन सिंहांचा मृत्यू झाला. ही घटना सावरकुंडला तालुक्यातील बाेराला गावानजीक साेमवारी मध्यरात्री सहा सिंह रेल्वेरूळ ओलांडत असताना घडली.
त्यात दाेन सिंह व एक सिंहीण ठार झाली, असे जुनागड वन्यप्राणी परिमंडळाचे मुख्य संरक्षक डी.टी.वासवदा यांनी मंगळवारी सांगितले. या घटनेच्या तपासाचे आदेश वन विभागाला देण्यात आले आहेत. याप्रकरणी विभागाच्या कर्मचाऱ्यांचीही चांगलीच खरडपटटी काढण्यात आली. तसेच घटनेस जबाबदार असणाऱ्या वन कर्मचाऱ्यांवर कठाेर कारवाई केली जाईल, असेही त्यांनी सांगितले. दरम्यान, गीर हे आशिया खंडातील सिंहांचे एकमेव अभयारण्य आहे. यापूर्वी गत सप्टेंबरमध्येही एका छाव्यासह सिंहाचा अशाच एका घटनेत मृत्यू झाला हाेता. यासह विशिष्ट विषाणूंच्या संसर्गामुळेही काही सिंहांचा मृत्यू झाला हाेता. त्यामुळे मृत्युमुखी पडलेल्या सिंहांची संंख्या ३५ झाली आहे.

Post a Comment