परिणिती आणि चरित यांच्या नात्याची सुरुवात ड्रीम टीम टूर 2016 दरम्यान झाली होती.
मुंबई. प्रियांका चोप्राच्या लग्नाच्या वृत्तांनंतर आता तिची कजिन परिणिती चोप्राच्या लग्नाविषयी वृत्त येत आहे. परिणिती चरित देसाई नावाच्या मुलाला डेट करत आहे आणि लवकरच ते लग्न करणार आहे असे वृत्त आहे. परिणिती आणि चरित आपल्या नात्याच्या पुढच्या स्टेपमध्ये जाण्याची पुर्ण तयारी करत आहे असे बोलले जातेय. पण परिणितीने स्वतः या सर्व गोष्टींचे खंडन केले आहे. यामुळे या सर्व अफवांना आणि अंदाजांना पुर्णविराम मिळाला आहे. परिणितीने एका प्रसिध्द वृत्तपत्राचा रिपोर्ट ट्विटरवर शेअर करत लिहिले की, "पुर्णपणे निराधार आणि खोटे! जेव्हा मी लग्न करेल तेव्हा आनंदात ही घोषणा करेल." परिणिती आणि चरित यांच्या नात्याची सुरुवात ड्रीम टीम टूर 2016 दरम्यान झाली होती.

Post a Comment