0
अनेक वर्षांपासुन विकत आहे हे प्रोडक्ट.

नवी दिल्ली- जगातील लोकप्रिय फार्मासूटिकल कंपनी जॉनसन अँड जॉनसन अनेक वर्षांपासून बेबी प्रोडक्ट्स बनवण्यासाठी लोकप्रिय आहे. पण काही दिवसांपूर्वी एका इंग्रजी वृत्तपत्राने खुलासा केला आहे की या बेबी पाउडरमध्ये एस्बेस्टोस मिसळलेले आहे. हे खरे आहे की हल्लीच अमेरिकेच्या मिसौरीमध्ये एका न्यायालयाने बेबी प्रोडक्ट बनवण्यारी कंपनी जॉनसन अँड जॉनसनवर बेबी पाउडरच्या वापराने कँसर होत असल्याचे सिद्ध केले होते, ज्यानंतर न्यायालयाने कंपनीवर 32 हजार कोटींचा दंड लावला होता. पण कंपनीने या आरोपांचे खंडण केले आहे.


कंपनीच्या सगळ्या लोकांना माहिती होती ही गोष्ट
वृत्तपत्याने अजून एक खुलासा केला आहे की, कंपनीला अनेक दिवसांपासून माहित होते की प्रोडक्टमध्ये एस्बेस्टोसचा वापर केला जात आहे, ज्यामुळे कँसर होण्याची शक्यता आहे. कंपनीच्या खासगी कागदपत्रांचा दाखला देत या रिपोर्टमध्ये सागण्यात आले की, कंपनीचे एग्जझक्यूटिवपासून ते माइन मॅनेजर, सायंटिस्ट, डॉक्टर आणि वकील यांनाही या गोष्टींची माहिती होती. हे सर्व माहित असूनही कंपनी अनेक वर्षांपासून हे प्रोडक्ट विकत आहे. त्याशिवाय त्यात हे सांगण्यात आले आहे की, कंपनीची अनेक कागजपत्रे वाचण्यात आली आहेत आणि यात हे समोर आले की, 1971 ते 2000 पर्यंत जॉनसन अँड जॉनसनचे रॉ पाउडर आणि बेबी पाउडरच्या अनेक टेस्टमध्ये समोर आले की यात एस्बेस्टस मिसळले जाते.


कंपनीचे शेअर कोसळले
रिपोर्टमध्ये हेही सांगण्यात आले की, कंपनीने कॉस्मेटिक टॅल्कम पाउडरमध्ये एस्बेस्टसची मात्रा कमी करण्याच्या प्रयत्नातच्या विरोधात अमेरिकेच्या रेगुलेटर्सवर दबावदेखील टाकला आहे. या रिपोर्टनंतर कंपनीचे शेअर्स 10 टक्क्यांनी कोसळले आहेत.


रिपोर्ट खोटी असल्याचा कंपनीचा दावा
2002 नंतर पहिल्यांदा कंपनीचे शेअर्स इतक्या मोठ्या प्रमाणावर कोसळले आहेत. 2002 मध्ये कंपनीचे शेअर्स 16 टक्क्यांनी घसरले होते. कंपनीने या रिपोर्टला खोटे सांगितले आहे. कंपनीने या आरोपांचे खंडन केले आणि बेबी पाउडरमध्ये एस्बेस्टस न मिसळ्याचे सांगितले.

Post a comment

 
Top