0

अब्जाधीशांच्या प्रेमाचा अंदाज आहे निराळा

xनवी दिल्ली- काही दिवसांपूर्वीच ईशा अंबानी आणि आनंद पीरामल यांचे लग्न झाले. आनंदने ईशाला महाबलेश्वरच्या एका मंदीरात प्रपोज केले होते. त्याने एका खास अंदाजात तिला प्रपोज केले होते. त्याशिवाय अनेक असे अब्जाधीश आहेत ज्यांनी आपल्या जोडीदाराला खास अंदाजात प्रपोज केले आहे.


मुकेश अंबानी आणि नीता अंबानी - सिग्नलवर केले प्रपोज
रिलायंस इंडस्ट्रीजचे फाउंडर धीरुभाई अंबानीने नीताला मुकेश अंबानीसाठी पसंद केले होते, त्यांनीच नीताला आपल्या घरी बोलवले आणि मुकेशची ओळक करून दिली होती. त्यानंतर ते दोघे अनेकवेळा भेटले. एके दिवशी ते दोघे कारमधून जात होते, रस्त्यावर खुप ट्राफिक होते. तेव्हा त्यांची गाडी रेड लाइट सिग्नलला थांबली. तेव्हा मुकेश अंबानी यांनी नीता यांना लग्नासाठी प्रपोज केले होते.

राहुल शर्मा आणि आसिन – दिल्लीत डिनरच्या वेळेस केले प्रपोज
माइक्रोमॅक्स कंपनीचे फाउंडर राहुल शर्मा आणि बालीवुड अभिनेत्री आसिन यांच्या प्रपोजलचा किस्साही खुप खास आहे. राहुलने आसिनसाठी 20 कॅरेट सॉलिटेयर रिंग घेतली होती, ज्याची किंमत 6 कोटी रूपये आहे. दिल्लीत ते दोघे डिनरसाठी भेटले होते तेव्हा आसीनला राहुलने प्रपोज केले होते.


टीना आणि अनिल अंबानी - फिलाडेल्फियामध्ये केले प्रपोज 
अनिल अंबानी यांनी टीनाला एका लग्नात पहिल्यांदा पाहिले होते. त्यानंतर त्यांच्यात मैत्री झाली आणि एके दिवशी अनिल आणि टीना पिलाडेल्फिया येथे भटले. तेथेच अनिल यांनी टीनाला प्रपोज केले होते.


आनंद पीरामल आणि ईशा अंबानी - महाबळेश्वरमध्ये केले प्रपोज 
आनंद पीरामलने महाबळेश्वरच्या एका मंदीरात ईशाला लग्नासाठी प्रपोज केले होते.

Post a comment

 
Top