0
  • Sohrabuddin and other encounter was fake, CBI asserts in final argumentsमुंबई - देशातील सर्वात चर्चित एनकाउंटर्सपैकी एक सोहराबुद्दीन चकमकीवर सीबीआयने विशेष न्यायालयात आपला अंतिम युक्तीवाद मांडला. यामध्ये सोहराबुद्दीन चकमक बनावटच होती असे तपास संस्थेने स्पष्ट केले आहे. 2005 मध्ये राजस्थान आणि गुजरात पोलिसांच्या संयुक्त टीमकडून सोहराबुद्दीन एनकाउंटर घडला होता. यानंतर 2006 मध्ये त्याचा जवळिक तुलसीराम प्रजापती यालाही ठार मारण्यात आले होते. सीबीआयने हे दोन्ही एनकाउंटर फेक ठरवले आहेत.

    बड्या नेत्याच्या आदेशावर झाले फेक एनकाउंटर
    विशेष सीबीआय न्यायालयात सीबीआयची बाजू मांडणारे वकील बीपी राजू यांनी सांगितल्याप्रमाणे, दोन्ही एनकाउंटर बनावट असल्याचे पुरावे तपास संस्थेने कोर्टासमोर सादर केले आहेत. राजस्थानच्या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी तपास अहवालात सोहराबुद्दीनचे लश्कर ए-तोयबाशी संबंध असल्याचा खोटा दावा करण्यात आला होता. एवढेच नव्हे, तर तो पाकिस्तानी गुप्तचर संस्था आयएसआयच्या संपर्कात होता असेही चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले होते. परंतु, प्रत्यक्षात त्याचे एनकाउंटर एका बड्या राजकीय नेत्याच्या इशाऱ्यांवर घडवण्यात आले होते.

Post a Comment

 
Top