0
तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबध होते. मात्र ते तिच्या कुटुंबीयास मान्य नव्हते. मृत्यू समयी ती गरोदर असल्याचेही समोर आले

यावल- शहरात ‘ऑनर किलिंग’च्या संशयावरून पोलिसांनी मृत तरूणीच्या कुटुंबीयांची शनिवारी रात्री उशीरापर्यंत कसून चौकशी केली. दरम्यान 22 वर्षीय या तरूणीचा मृत्यू गुरूवारी (ता.20) झाला होता. तरुणी घटस्फोटीत होती. तरुणीचा मृत्यू संशयास्पद असून तिच्या कुटुंबीयानेच घातपात केल्याची तक्रार एका तरूणाने पोलिसांकडे केली आहे. या तक्रारीच्या पार्श्वभूमीवर तरूणीच्या कुटुंबीयास चौकशीसाठी पोलिसांनी बोलावले होते.

शहरात गुरूवारी एका 22 वर्षीय तरूणीचा मृत्यू झाला होता. सायंकाळीच तिच्या कुटुंबीयांनी मयत तरूणीवर अंत्यसंस्कार केले होते. मात्र, तिचा मृत्यू हा ‘ऑनर किलिंग’ असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. तरुणीचे एका तरुणासोबत प्रेमसंबध होते. मात्र ते तिच्या कुटुंबीयास मान्य नव्हते. मृत्यू समयी ती गरोदर असल्याचेही समोर आले आहे.
तरुणाच्या तक्रारीची दखल घेत शनिवारी उपविभागीय पोलिस अधिकारी राजेंद्र रायसिंग यांनी यावल पोलिस ठाण्यात मृत तरूणीच्या कुटुंबीयास बोलावून घेतले. त्यांची कसून चौकशी केली. विविध बाजुंनी पोलिस निरिक्षक डी. के. परदेशी, उपनिरिक्षक सुनीता कोळपकर, उपनिरिक्षक दीपक ढोमणे यांनी रात्री उशीरापर्यंत चौकशी केली. विशेष म्हणजे पोलिसांनी ‘त्या’ तक्रारदार तरूणाचीही चौकशी केली. मृत तरूणीस कुठलाही आजार नव्हता. केवळ तिचे प्रेमसंबध होते. त्यातून ती गर्भवती झाल्याने समाजात आपली बदनामी होईल, यावरून तिच्या कुटुंबीयांनी तिची हत्या केल्याचा आरोप तरुणाने केला आहे. या प्रकरणामुळे शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे. शहरात विविध चर्चेला उत आला आहे.

तथ्थ आढळल्यास कायदेशिर कारवाई..
घटस्फोटीत तरूणीच्या मृत्यूप्रकरणी एका तरूणाने तिच्या कुटुंबीयांवर घातपातचा आरोप केला आहे. तरुणीच्या कुटुंबीयांच्या विरोधात त्याने पोलिसांत‍ तक्रार दिली आहे. त्या अनुशंगानेच मृत तरूणीच्या कुटुंबीयांची पोलिसांनी चौकशी केली. सगळ्यांचा जाब नोंदवून घेण्यात आला आहे. तथ्थ आढल्यास तरुणीच्या कुटुंबीयांवर कायदेशिर कारवाई करू असे
पोलिस निरिक्षक डी.के. परदेशी यांनी सांगितले आहे.
honor killing in Yawal Police Investigation to Victem Famiy

Post a Comment

 
Top