0
सिनेमात काँग्रेसच्या काळातील घोटाळ्यांचे देण्यात आली आहे माहिती.

नवी दिल्ली- चित्रपट दिग्दर्शक विजय रत्नाकर गुट्टेची फिल्म The Accidental Prime Minister चे ट्रेलर रिलीज होताच ते वादाच्या भवऱ्यात अडकले आहे. चित्रपटातील काही संवादाच्या विरोधात काँग्रेसने विरोध दर्शवला आहे आणि याला भाजपचे षडयंत्र असल्याचे सांगितले आहे. चित्रपटात अनुपम खेर यांनी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे पात्र निभावले आहे. मनमोहन सिंग यांचे मिडिया सल्लागार संजय बारू यांच्या पुस्तकावर आधारीत हा चित्रपट दि अॅक्सिडेंट्ल प्राइम मिनिस्टर 11 जानेवारीला रिलीज होत आहे. चित्रपटात काँग्रेसच्या कार्यकाळात झालेल्या घोटाळ्यांचा उल्लेख आहे. पण तुम्हाला माहित आहे का, डायरेक्ट विजय रत्नाकर स्वत: 34 कोटींच्या जीएसटी फ्रॉड प्रकरणात तुरूंगात गेले आहेत.

चुकीच्या बीलमुळे 34 कोटींचा घोटाळा 
या प्रकरणात GST इंटेलिजेंसने त्यांना मुंबईतून अटक करण्यात आले होते आणि त्यांना अनेक दिवस मुंबईच्या ऑर्थर रोड जेलमध्ये न्यायलयिन कोठडीत राहावे लागले होते. गुट्टे यांची फर्म वीजीआर डिजिटल कॉर्प प्रायव्हेट लिमिटेडने चुकीचे बील दाखवून 34 कोटींचा घोटाळा केला होता. गुट्टे यांना CGST अधिनियम अॅक्ट 132 (1) (सी) अंतर्गत न्यायालयाने तुरूंगात टाकले होते.Director of The Accident Prime Minister Vijay Gutte has been arrested for GST fraud

Post a Comment

 
Top