या प्रकरणात जलदगतीने न्याय मिळावा, यासाठी पोलिसांनी योग्य ती करवाई करावी, असे विजया रहाटकर यांनी पोलिस आयुक्तांना सांगितले. दरम्यान, एमजीएम महाविद्यालयाच्या वसतीगृहात विद्यार्थिनी आकांक्षा देशमुख हिची निर्घृण हत्या करण्यात आली होती. मूळची बीड जिल्ह्यातील माजलगाव येथील रहिवासी असलेली आकांक्षा ही फिजिओथेरपीच्या तिसर्या वर्षात शिक्षक होती. 10 डिसेंबरच्या रात्री आरोपी राहुल शर्मा याने आकांक्षाचा गळा आवळून खून केला होता. तो चोरीच्या हेतूने तिच्या रुममध्ये शिरला होता. पोलिसांनी आरोपीला उत्तर प्रदेशातून अटक केली होती.

Post a Comment