0
  • मुंबई : टीव्ही शो 'साथ निभाना साथिया' मधील गोपी बहू आता मोठ्या संकटात सापडली आहे. देवोलिनाचे नाव हिऱ्यांचे व्यापारी राजेश्वर किशोरीलाल उडाणी मर्डर केसमध्ये समोर आले आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अभिनेत्री देवोलिना भट्टाचार्याला पोलिसांनी अजूनही या प्रकरणातून मुक्त केलेले नाही. पोलीस या केसमध्ये तिच्या इन्व्हॉल्व्हमेंटची तपासणी करत आहे. या प्रकरणात देवोलिनाचा कशा प्रकारे हात आहे हे जाणून घेण्यासाठी पोलीस देवोलिनाच्या घराची झडती घेत आहेत.

    राजेश्वर लापत्ता झाल्यावर मुंबई शहर सोडून गेली होती देवोलिना.. 
    राजेश्वर उडानी लापत्ता होण्याआधी देवोलिना त्याच्या संपर्कात होती. एवढेच नाही तर राजेश्वर लापत्ताहोण्याच्या एक दिवस अगोदर देवोलिना शहर सोडून पळून गेली होती. त्यानंतर पोलिसांनी तिला गोवाहाटीमधून पकडून आणले होते. आता या केसची इन्वेस्टीगेशन संपेपर्यंत तिला मुंबईमध्येच राहण्याचे आदेश दिले गेले आहेत. इन्वेस्टीगेशनसाठी दोन तीन दिवसात पुन्हा देवोलिनाला पोलीस स्टेशनमध्ये बोलावणार आहे.
    खूप तणावात होती देवोलिना.. 
    सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, व्यापारी राजेश्वर देवोलिनाला कोणत्यातरी गोष्टीसाठी सात-आठ महिन्यांपासून प्रेशराइज करत होता. त्यामुळे देवोलिना तणावात होती. याबाबतीत तिने तिचा लिव्ह इन पार्टनर सचिन पवार याच्याशी बातचीत केली होती. ज्यामुळे नंतर उडणीसोबत बरीच वादावादीही झाली होती. मात्र देवोलिनाने तिच्यावर लागलेले सर्व आरोप अमान्य केले आहेत. तिने सांगितले, 'मला फक्त काही प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी बोलावले होते, मला अरेस्टही केले नव्हते किंवा कस्टडीतही ठेवले नव्हते. पण काही काळापासून राजेश्वर लापत्ता होता आणि मागच्याच महिन्यात त्याचा मृतदेह मुंबई जवळील पनवेलच्या फॉरेस्ट एरियामध्ये सापडला.
    'बिग बॉस' ची ऑफर नाकारली होती देवोलिनाने.. 
    देवोलिनाला मागच्यावर्षी 'बिग बॉस या रिऍलिटी शोमध्ये भाग घेण्यासाठी विचारले गेले होते. पण तिने या ऑफरला नकार दिला होता. देवोलिनाचे म्हणणे आहे, "मला सुपरस्टार सलमान खान सोबत काम तर करायचे आहे पण मी 'बिग बॉस' हा शो करू शकत नाही. या शोसाठी मला विचारले गेले होते. मी चॅनेल आणि प्रोडक्शन हाऊसची आभारी आहे कि त्यांनी माझा विचार केला. पण मी नेहमीच डान्स बेस्ड रिऍलिटी शो किंवा 'खतरो के खिलाडी' असे शो करू इच्छिते.

Post a Comment

 
Top