0
धुळे : लग्न समारंभात सुरू असलेल्या फोटोसेशनची संधी साधून चोरट्यांनी ३२ तोळे सोने आणि ४० हजार रुपये लांबवले. शहरापासून जवळ असलेल्या झंकार गार्डन येथे हा प्रकार घडला. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरू केला आहे. फोटो काढण्यासाठी मागवण्यात आलेल्या ड्रोन कॅमेऱ्याचे शूटिंग पोलिसांना सोपवण्यात आले.


शहराजवळून जाणाऱ्या मुंबई-आग्रा महामार्गाजवळ हॉटेल झंकार गार्डन आहे. या ठिकाणी शिरपूर येथील पंचायत समितीमध्ये कार्यरत असलेले सुनील विठ्ठल पाटील यांच्या मुलीचा विवाह होता. या विवाहासाठी पाटील कुटुंबीय नातलगांच्या भेटीत गुंतले हाेते. त्या वेळी सुमारे ३२ तोळ्यांचे दागिने, ४० हजारांची रोकड, दोन मोबाइल आदी साहित्य सुनील पाटील यांनी पांढऱ्या रंगाच्या पर्समध्ये ठेवले होते. ही पर्स त्यांची पत्नी शैला पाटील यांच्याकडे होती. लग्न लागल्यानंतर नातलगांसह स्टेजवर फोटोसेशन सुरू झाले. त्यामुळे श्रीमती पाटील यांनी पर्स आईजवळ असलेल्या सोफ्यावर ठेवली. त्यानंतर त्याही फोटोसेशनमध्ये गुंतल्या. त्यानंतर काही वेळात श्रीमती पाटील सोफ्याजवळ परत आल्या. त्या वेळी त्यांना पर्स आढळली नाही. या वेळी पाटील कुटुंबीयांनी सर्वत्र पर्सचा शोध घेतला. मात्र, पर्स मिळाली नाही. फोटोसेशची संधी हेरून अज्ञात चोरट्याने पर्स लांबवली होती. हा प्रकार काल मंगळवारी रात्री साडेआठ ते साडेनऊ वाजेच्या दरम्यान घडला. या घटनेनंतर बुधवारी दुपारी सुनील पाटील यांनी शहर पोलिस ठाणे गाठले. लग्नात केलेले व्हिडिओ शूटिंगसह ड्राेन कॅमेऱ्याचे शूटिंग त्यांनी


या दागिन्यांची चोरी...
या घटनेत चोरट्यांनी साडेबारा तोळे वजनाच्या सोन्याच्या बांगड्या, साडेचार तोळ्यांचा नेकलेस, आठ तोळ्यांचा हार, साडेतीन तोळ्यांचा राणीहार, एक तोळ्याचा लक्ष्मीहार, एक तोळ्याच्या दोन अंगठ्या, दीड तोळ्याचा सोन्याचा गोफ लांबवला. taking a chance of photoshoots, the thieves lumped gold

Post a Comment

 
Top