0
कुठे आणि केव्हा होणार रिसेप्शन

बॉलिवूड डेस्क. कॉमेडियन कपिल शर्माने 12 डिसेंबरला गर्लफ्रेंड गिन्नी चतरथसोबत लग्न केले आहे. दोघांचा फर्स्ट लूक समोर आला आहे. कपिल ग्रीन गोल्डन शेरवानीमध्ये दिसला तर गिन्नी रेड गोल्डन लहेंग्यामध्ये खुप सुंदर दिसत होती. यासोबतच कपिलने पगडी घातली आणि त्याच्या हातात तलवारही दिसली. स्टेजवर पोहोचताच कपिल आणि गन्नीने हसत मीडियाला पोज दिल्या.

कुठे आणि केव्हा होणार रिसेप्शन
लग्नानंतर कपिल 2 रिसेप्शन देणार आहे. पहिले रिसेप्शन 14 डिसेंबरला अमृतसरमध्ये होणार आहे. यामध्ये कुटूंब आणि जवळचे नातेवाईक सहभागी होतील. तर दूसरे रिसेप्शन 24 डिसेंबरला मुंबईमध्ये होईल. येथे बॉलिवूड इंडस्ट्रीचे अनेक स्टार्स सहभागी होतील. कॉमेडियन कृष्णा अभिषेक, सुमोना चक्रवर्ती, भारती सिंह, आरसी सिंग, हर्ष लिम्बाचिया, राजीव ठाकुर आणि सिंगर ऋचा शर्माही कपिलचे लग्न अटेंड करत आहेत. यासोबतच प्रसिध्द सेंड आर्टिस्ट सुदर्शन पटनायकने कपिल-गिन्नीला आपल्या अंदाजात लग्नाच्या शुभेच्छा दिल्या. सुदर्शनने सेंड आर्ट बनवून कपल्सला शुभेच्छा दिल्या.Kapil Sharma and Ginni married on 12th December, first photo

Post a Comment

 
Top