भरधाव जाणाऱया टाटा एस टेम्पोची रस्त्याकडेला थांबलेल्या उसाने भरलेल्या ट्रॉलीला जोराची धडक बसली. यामध्ये टाटाएस पलटी होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात 6 महिला जागीच ठार झाल्या. तर 17 जण जखमी झाले आहेत. ही घटना गोकाक-संकेश्वर राज्यमार्गावर हिरेनंदी व चिकनंदी गावच्या मध्यवर्ती ठिकाणी सहय़ाद्री धाब्यासमोर सोमवारी मध्यरात्री 2.15 वाजता घडली. अपघातातील मृत व जखमी सौंदत्ती तालुक्यातील माडमगेरी व यरगनगी गावचे रहिवासी आहेत. या वृत्ताने दोन्ही गावांवर शोककळा पसरली आहे.
गंगव्वा सिद्धाप्पा हुरळी (वय 30), यल्लव्वा बाळाप्पा पुजारी (वय 45), यल्लव्वा मारुती गुंडाण्णावर (वय 40), रेणुका फकिरप्पा सोपडला (वय 35 सर्व रा. यरगनगी), काशव्वा शिवाप्पा खंडरी (वय 70) व पारव्वा कलाप्पा खंडरी (वय 50 दोघी रा. माडमगेरी) अशी मृत महिलांची नावे आहेत. चालक चिदानंद मल्लाप्पा खंडरी, भिमाप्पा फकिरप्पा बसीडोणी, मलाप्पा शिवाप्पा खंडरी, जयश्री रामचंद्र खंडरी, महादेवी दुंडाप्पा यरझरवी, यल्लाप्पा सिद्धाप्पा खंडरी, निंगाप्पा शिवाप्पा खंडरी, शारव्वा मल्लाप्पा खंडरी, यल्लाप्पा मलाप्पा खंडरी (सर्व रा. माडमगेरी) फकिरप्पा गंगाप्पा सोपडला, महादेव शिवानंद हुरळी, गंगाप्पा यमण्णाप्पा सोपडला, बाळाप्पा लकाप्पा दुंडपण्णावर, महादेव नायकप्पा केंमन्नाकोळ, अनुसया फकिरप्पा नायकर, निलव्वा फकिरप्पा सोलभन्नावर, रेणुका फकिरप्पा सोपडला (सर्व रा. यरगनगी, ता. सौंदत्ती) अशी अपघातातील जखमींची नावे आहेत. जखमींवर
गोकाक येथील उमराणी व निमरा या दोन खासगी दवाखान्यात उपचार सुरू आहेत.

Post a Comment