सचिन पिळगावकर आहेत निर्माते आणि संगीत दिग्दर्शक..
एंटरटेन्मेंट डेस्क : 'ती सध्या काय करते' या चित्रपटाने अभिनय बेर्डेला भरघोस यश मिळवून दिले. या चित्रपटानंतर त्याचे फॅन फॉलोविंग प्रचंड वाढले. आणि आता अभिनय अजून एका चित्रपटाद्वारे प्रेक्षकांच्या समोर येणार आहे. अभिनयच्या आगामी चित्रपटाचे नाव आहे 'अशी ही आशिकी'...
सचिन पिगावकर यांनी गेल्यावर्षी त्यांच्या बिर्थडे च्या निमित्ताने एका नवीन चित्रपटाची घोषणा केली होती. हाच चित्रपट घेऊन सचिन पिळगावकर आता अभिनयसोबत येत आहेत. या चित्रपटात संगीत दिग्दर्शनही सचिन पिळगावकर यांनीच केले आहे. हा चित्रपट 14 फेब्रुवारीला प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. टी सिरीज या चित्रपटाची निर्मिती करत असून येत्या व्हेलेंटाईन डेला हा चित्रपट प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अभिनयने ती सध्या काय करते या त्याच्या पहिल्याच चित्रपटाद्वारे चांगलेच फॅन फॉलॉविंग मिळवले आहे. त्यामुळे त्याच्या अशी ही आशिकी या चित्रपटाची त्याच्या फॅन्सना चांगलीच उत्सुकता लागली असणार यात काही शंकाच नाही.

Post a Comment