0
  • after hearing boyfriends murder girl burns her phoneइंदुर- युवकाच्या खूनाच्या प्रकरणात आरोपींना पकडण्यात पोलिसांना अपयश आले आहे. आत्तापर्यंत 20 संशयीतांची चौकशी केली असून एका युवतीला अटक करण्यात आली आहे. घटनेनंतर युवतीने आपला फोन जाळला होता, पण कॉल डीटेल्सवरून तिचे अनेक मुलांसोबत संबंध असल्याचे उघडीस आले आहे.
    - डीआयजी हरिनारायणचारी मिश्रा यांनी सांगितले की, न्यू रामनगरमध्ये राहणारा 19 वर्षीय रितिक पांडेची अज्ञातांनी दगडाने ठेचून हत्या केली होती. त्याचे गौरीनगरमध्ये राहणाऱ्या मुलीसोबत प्रेमसंबंध होते. मृत्युच्या आधी त्या दोघांचे फोनवर संभाषण झाले होते. तो तिला शनिवारी फिल्म दाखवायला घेऊन जाणार होता.
    - कॉल डिटेलच्या आधारवर क्राइम ब्रँचने शुक्रवारी युवतीला ताब्यात घेतले आहे. चौकशी दरम्यान तिने कुबूल केले की, ती रितिकला ओळखत होती. रोज ते फोनवर बोलायचे, पण त्याच्या खूनाची बातमी मिळताच तिने तिचा फोन जाळून टाकला.
    - तिच्या कॉल डीटेल्सवरून कळाले की, तिचे इतर मुलांसोबतही प्रेम संबंध आहेत. त्यामुळे पोलिसांना प्रेम त्रिकोणातून हत्त्या झाल्याचा संशय आहे. पोलीस प्रकरणाचा तपास लावत आहेत.

Post a Comment

 
Top