राजांनी मागितली माफी- ‘विसरा अन् माफ करा’ धाेरणांतर्गत अण्णाद्रमुकमध्ये दिला पुनर्प्रवेश
चेन्नई- तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री व अाॅल इंडिया अण्णाद्रमुकचे ज्येष्ठ नेते ओ. पनीरसेल्वम यांचे बंधू अाे. राजा यांना पुन्हा पक्षात घेण्यात अाले अाहे. अण्णाद्रमुकच्या ‘विसरा अन् माफ करा’ धाेरणांतर्गत त्यांना पक्षात पुनर्प्रवेश देण्यात अाला, असे बुधवारी पक्षाचे वरिष्ठ नेते व राज्याचे मत्स्यपालनमंत्री डी. जयकुमार यांनी चेन्नईत प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींना सांगितले.
दरम्यान, हे धाेरण पक्षाच्या अपदस्थ नेत्यांना लागू हाेत नसल्याने व्ही. के. शशिकला व त्यांचे भाचे टीटीव्ही दिनाकरन यांच्याबाबत विचार केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
पनीरसेल्वम यांचे भाऊ अाे. राजा यांची गत अाठवड्यात पक्षातून हकालपट्टी करण्यात अाली हाेती. अापल्या कृत्याबद्दल माफी मागितल्याने त्यांची पुन्हा घरवापसी करण्यात अाली; परंतु पक्षाविराेधातील काेणत्या कृत्यामुळे राजांवर हकालपट्टीची कारवाई झाली हे सांगण्यास मात्र डी. जयकुमार यांनी नकार दिला. दरम्यान, राजा यांना १९ डिसेंबर राेजी पक्षविराेधी कारवाई केल्याने समन्वयक पनीरसेल्वम व संयुक्त समन्वयक मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द केले हाेते. तसेच सर्व पदे काढून घेत पक्षातून बाहेरचा रस्ता दाखवला हाेता. तथापि, माफी मागितल्याने व पक्षात घेण्याची विनंती केल्याने साेमवारी त्यांना पक्षामध्ये घेण्यात अाले.
हा पक्षासाठी माेठा मुद्दा नाही
पक्षाच्या एखाद्या पदाधिकाऱ्याला अापल्या कृत्याबद्दल खेद वाटल्यास व त्याने तसे जाहीररीत्या कबूल करून पुन्हा पक्षात घेण्याची विनंती केल्यास त्याला माफ करणे अापले कर्तव्य ठरते. अण्णाद्रमुकनेही हाच विचार करून राजांना माफ करत पुन्हा पक्षात समाविष्ट केले. अशा प्रकारची कारवाई पक्षाच्या अध्यक्षा जयललितांच्या काळातही झाली हाेती. तसेच हा पक्षासाठी माेठा मुद्दा नाही. त्यामुळेच राजांना माफ करण्याचा निर्णय पक्षाने घेतल्याचे जयकुमार यांनी सांगितले.
शशिकला व दिनाकरन यांच्या प्रवेशाबाबत पक्ष सकारात्मक
शशिकला व त्यांचे भाचे दिनाकरन या दाेघांपैकी कुणीही अापल्या कृत्याबद्दल खेद व्यक्त केल्यास त्यांना पक्षात पुन्हा घेण्याबाबत विचार हाेऊ शकताे. पक्ष याबद्दल सकारात्मक अाहे, असेही जयकुमार यांनी स्पष्ट केले. दरम्यान, गतवर्षी पक्षविराेधी कारवाई केल्याने दिनाकरन यांना पक्षातून निलंबित करण्यात अाले हाेते. त्यानंतर त्यांनी वेगळी चूल मांडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे विधानसभा अध्यक्ष पी. धनपाल यांनी अपात्र घाेषित केले हाेते. हे प्रकरण न्यायालयात गेले हाेते. तसेच मद्रास उच्च न्यायालयाने अलीकडेच त्यांची अपात्रता कायम ठेवली हाेती.

Post a Comment