0
यजमान महाराष्ट्र संघाने १४ वर्षे मुलांच्या गटात आयबीएएसओ संघाचा २-० असा पराभव केला.

औरंगाबाद- जिल्हा क्रीडा परिषद व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय क्रीडा संकुलात आयोजित राष्ट्रीय शालेय बॅडमिंटन स्पर्धेत यजमान महाराष्ट्र १४ व १९ वर्षांखालील मुला-मुलींच्या संघांनी शानदार विजय मिळवत विजयी सलामी दिली. त्याप्रमाणे केरळ, गुजरात, तेलंगण, तामिळनाडू, पंजाब संघांनी आपापल्या गटात विजयी आघाडी घेतली.
यजमान महाराष्ट्र संघाने १४ वर्षे मुलांच्या गटात आयबीएएसओ संघाचा २-० असा पराभव केला. विजेत्या संघाकडून प्रथम वाणी, तेजस शिंदे, सान्विक चौधरीने शानदार खेळाचे प्रदर्शन केले. मुलींच्या गटात महाराष्ट्र संघाने उत्तराखंड संघावर २-० अशी सहज मात केली. महाराष्ट्राने अनन्या दुरवगर, क्रिपी साजवान, श्रेया भोसलेच्या उत्कृष्ट खेळाच्या बळावर बाजी मारली. १९ वर्षांखालील मुलांच्या गटात महाराष्ट्र संघाने दादर नगर हवेली संघावर २-० असा सहज विजय संपादन केला.
स्पर्धेचे उद्घाटन विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी एसजीएफआयचे अभिषेक सारस्वत, क्रीडा उपसंचालक राजकुमार महादवाड, जिल्हा संघटनेचे सचिव सिद्धार्थ पाटील, डिएसओ अशोक गिरी यांची उपस्थिती होती.
सांघिक निकाल 
१४ वर्षे मुले : महाराष्ट्र वि. वि. आयबीएसएसओ (२-०), गुजरात वि. वि. उत्तर प्रदेश (२-०), तामिळनाडू वि. वि. आयपीएससी (२-१), बिहार वि. वि. सीबीएसई (२-१). मुली - महाराष्ट्र वि. वि. उत्तराखंड (२-०), झारखंड वि. वि. जम्मू-काश्मीर (२-०), तामिळनाडू वि. वि. विद्याभारती (२-१). १९ वर्षे मुले - तेलंगण वि. वि. आंध्र प्रदेश (२-१), केरळ वि. वि. ओडिशा (२-०), महाराष्ट्र वि. वि. दादर नगर हवेली (२-०), गुजरात वि. वि. दमण व दीव (२-०), आयपीएसई वि. वि. हिमाचल प्रदेश (२-०). मुली - दिल्ली वि. वि. चंदिगड (२-१), एनव्हीएस वि. वि. विद्याभारती (२-१), छत्तीसगड वि. वि. झारखंड (२-०), पंजाब वि. वि. मध्य प्रदेश (२-१), तेलंगण वि. वि. दादर नगर हवेली (२-०).News about National Badminton Tournament

Post a Comment

 
Top