0

मोदी म्हणाले, देशाच्या स्वसंरक्षणाला नव्याने बळकटी मिळाली आहे.

  • नवी दिल्ली- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला आकाशवाणीवरील कार्यक्रम "मन की बात'मध्ये रविवारी या वर्षातील शेवटच्या भागात संवाद साधला. कार्यक्रमाच्या ५१ व्या भागात मोदी म्हणाले, नकारात्मकता पसरवणे खूप सोपे आहे. मात्र, आपल्या समाजात, आजूबाजूस खूप चांगले काम होत आहे आणि हे सर्व १३० कोटी देशवासीयांच्या सामूहिक प्रयत्नांतून होत आहे.
    मोदी म्हणाले, २०१८ ला भारत एका देशाच्या रूपात आपल्या १३० कोटी जनतेच्या सामर्थ्याच्या रूपात कसे लक्षात ठेवेल, याची आठवण करणेही महत्त्वाचे आहे. हे वर्ष आपणा सर्वांच्या गौरवाने भारावलेले वर्ष आहे. मोदी म्हणाले, देशाच्या स्वसंरक्षणाला नव्याने बळकटी मिळाली आहे. या वर्षी आपल्या देशाने अणुचाचण्या यशस्वीरीत्या पूर्ण केल्या. म्हणजे, आपण जल, स्थल व आकाश तिन्ही ठिकाणी अण्वस्त्रसमृद्ध झालो आहोत.

    कुंभमेळ्याची छायाचित्रे सोशल मीडियावर टाका :
    पंतप्रधान मोदी उत्तर प्रदेशच्या प्रयागराज(अलाहाबाद) कुंभमेळ्याचा उल्लेख करत म्हणाले, येथे श्रद्धा व भक्तीचा जनसागर उसळतो. माझी तुम्हाला विनंती आहे की, कुंभमेळ्यात गेल्यास वेगवेगळ्या पैलूंची छायाचित्रे सोशल मीडियावर अवश्य शेअर करा.
    वेदांगी कुलकर्णीचा केला उल्लेख 
    मोदी यांनी पुण्याची २० वर्षीय युवती वेदांगी कुलकर्णीचा उल्लेख केला. वेदांगीने सायकलवर जगभ्रमण करणारी सर्वात वेगवान आशियाई होण्याचा बहुमान मिळवला आहे. याशिवाय मोदींनी काश्मीरची कराटे चॅम्पियन हनाया निसारचे कौतुक केले. १६ वर्षांच्या रजनीने ज्युनियर महिला मुष्टियुद्ध चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले आहे. १२ वर्षीय हनाया निसारने कोरियातील कराटे चॅम्पियनशिपमध्ये सुवर्णपदक जिंकले. ती काश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील आहे. हनायाने मोठ्या कष्टाने सराव केला कराटेतील बारकावे शिकले आणि यश मिळवले. दरम्यान, पंतप्रधानांनी केलेले कौतुक ऐकून आनंद वाटल्याची प्रतिक्रिया हनायाने दिली आहे.Modi's 'man ki baat'

Post a Comment

 
Top