बँकॉक- थायलंडमध्ये सेफ्टी ड्रिलच्या दरम्यान एक मोठा अपघात होता-होता राहिला, सापापासून कसे वाचायचे याचे प्रात्याक्षिक एक फायरमॅन दाखवताना अजगरने त्याच्या शरीराला जोराने वेटुळा मारला. स्वत:च्या शरीराभोवती अजगराला त्याने गुंडाळुन घेतले त्यानंतर अजगराने आपली ताकत दाखवली आणि त्या व्यक्तीच्या गळ्याभोवती वेटुळा मारला. ज्या अजगराने व्यक्तीला वेटुळा मारला तो 5 मीटर लांब होता. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल होत आहे.
डेमो दरम्यान थोडक्यात जीव वाचला
- ही घटना थायलंडची राजधानी बँकॉकच्या एका बाजारात घडली. सेफ्टी ड्रील संबंधीत सुरक्षा कशी करावी याचे प्रात्याक्षिक सुरू होते. त्या दरम्यान एपिचेट नावाच्या एका फायरमॅनच्या बॉडीवर अजगराने वेटुळा मारला होता, त्याच्या बाजूला एक दुसरा व्यक्ती सांगत होती की, सापाने वेटुळा मारल्यावर त्यातुन कसे सोडवावे.
- दुसरा व्यक्ती समोरील लोकांना सापापासून कसे वाचावे याची माहिती देत होता त्या दरम्यान अजगराने व्यक्तीच्या गळ्याभोवती मारलेला वेटुळा जास्त अवळुन धरला.
व्यक्तीला न कळता अजगराने मारला वेटुळा
- अंगावर वेटुळा मारलेल्या व्यक्तीच्या सोबत असलेल्या दुसऱ्या व्यक्तीने कसे वाचावे याची माहिती देत असताना, अजगराने चलाखीने मारला वेटुळा.
- त्या व्यक्तीला अजगराच्या तावडीत पाहून लोकांनी त्याची मदत केली आणि त्याला अजगराच्या तावडीतून सोडवले. तो दिवस फायरमॅनसाठी सगळ्यात आठवणीतीत राहणार आहे.

Post a Comment