तोकडे कपडे व स्कीन टच शॉर्ट कपडे वापरून पार्टीत सहभागी झाल्या तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल.
अहमदाबाद- गुजरातच्या बडोदा पोलिसांनी एक सूचना जारी केली आहे. यात म्हटले आहे की, नव्या वर्षाच्या स्वागतार्थ तरुणी तोकडे कपडे व स्कीन टच शॉर्ट कपडे वापरून पार्टीत सहभागी झाल्या तर त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येणार आहे. लोकांना अश्लील नाच करता येणार नाही.
रात्री 10 नंतर लाऊडस्पीकर व डीजेचा वापर करणाऱ्यांवर बंदी राहील. पोलिस आयुक्त अनुपमसिंह गहलोत यांनी सांगितले, अश्लील नृत्याचा लहान मुलांवर विपरीत परिणाम हाेतो. खासगी ठिकाणी डान्सचा कार्यक्रम ठेवण्यासाठी सीसीटीव्ही बसवणे सक्तीचे केले आहे, असेही सिंग म्हणाले.
Post a Comment