0

१८ ते २३ वर्षांच्या १५ कोटी मतदारांना जोडण्यासाठी पक्षाची व्यूहरचना, जानेवारी ते मार्चदरम्यान चालवणार १४ मोहिमा

 • नवी दिल्ली- अलीकडेच तीन राज्यांत झालेल्या पराभवाचे भाजपने विश्लेषण केले. त्यात शहरी-निमशहरी युवकांनी पक्षाला मत दिले नाही, असे त्यात आढळले. त्यामुळे भाजप अध्यक्ष अमित शहांनी पक्षाच्या युवा मोर्चाकडे मोठी जबाबदारी सोपवली आहे. शहांनी १३ डिसेंबरला राष्ट्रीय पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत त्याची रणनीती सांगितली. १८ ते ३५ वयोगटाच्या ३० कोटी मतदारांना जोडण्याचा पक्षाचा प्रयत्न आहे. त्यामुळे प्रथमच मत देणाऱ्या युवकांसाठी ‘पहिले मत मोदींना’ ही घोषणा दिली आहे. या मोहिमेची सूत्रे युवा खासदार पूनम महाजन यांच्या नेतृत्वातील युवा मोर्चाकडे दिली आहे. युवा मोर्चा १४ मार्चआधी कार्यक्रम करेल. मोहिमेची सुरुवात १२ जानेवारीला राष्ट्रीय युवा दिनापासून होईल. त्याच दिवशी भाजपचे राष्ट्रीय अधिवेशनही होईल. शहांच्या मते, २०१९ ची निवडणूक पानिपतच्या लढाईसारखी आहे. त्यानंतर देशाला मोगल-इंग्रजांच्या गुलामीत २०० वर्षे घालवावी लागली. त्याचप्रमाणे भाजपने २०१९ ची निवडणूक जिंकली तर ५० वर्षांपर्यंत संसद ते पंचायत स्तरापर्यंत शासनाचे उद्दिष्ट पूर्ण होईल. पण हरल्यास विचारधारेची लढाई २५ वर्षे मागे जाईल.

  भाजपला गेल्या लोकसभा निवडणुकीत १७.५ कोटी मते मिळाली होती, तीत प्रथम वेळच्या मतदारांची महत्त्वाची भूमिका होती. ‘दिव्य मराठी’शी झालेल्या चर्चेत पूनम महाजन यांनी सांगितले की, युवकांचा मोदींच्या नेतृत्वावर विश्वास आहे. त्यामुळे विजय लक्ष्य-२०१९ मोहिमेत हा विश्वास आणखी दृढ करण्याचे काम करू. १८ ते २३ वर्षांच्या १५ कोटी मतदारांना कॉलेजच्या माध्यमातून जोडण्यासाठी सहास्तरीय रणनीती तयार आहे. पहिली-निर्भीड मत असणारे लेखक, ब्लॉगर, सोशल मीडियाशी संंबंधित लोकांचा एक चमू तयार होईल. दुसरी-सामाजिक समीकरणाच्या दृष्टीने विविध वर्गांच्या प्रतिनिधींचा चमू करणे. तिसरी-विविध सामाजिक, सांस्कृतिक संघटनांशी संबंधित लोकांचा चमू करणे. चौथी-प्रोफेशनल्सची मदत घेणे. पाचवी-चांगले वक्ते आणि नेतृत्वक्षमता असलेले लोक निवडले जातील. सहावी-तंत्रज्ञानाशी संबंध आणि ते समजणाऱ्या आयटीशी संबंधित युवकांचा चमू तयार केला जाईल.
  गीत-संगीतासह मोटारसायकल रॅलीपर्यंत केले आयोजन 
  >पहिले मत मोदींना : आयुष्यातील पहिले मतदान मोदींना दिले जावे, असा संकल्प सोडण्यास नवमतदारांना सांगितले जाईल. 
  >नेशन विथ नमो: नमो युवा नावाचे हॅशटॅग बनून ऑनलाइन मोहीम सुरू केली जात आहे. त्यासाठी एक विशिष्ट गीत तयार केले आहे. 
  >युवा खासदार : १५ जानेवारी ते १० फेब्रुवारीपर्यंत देशातील सर्व विद्यापीठांत युवकांच्या चर्चासत्राचे आयोजन होईल. 
  >कमळ कप क्रीडा स्पर्धा : जिल्हा व राज्यस्तरावर १२ जानेवारी ते १५ फेब्रुवारीपर्यंत याचे आयोजन होईल. 
  >कॅम्पस अॅम्बेसेडर नेटवर्क : महाविद्यालय स्तरावर कॅम्पस अॅम्बेसेडर तयार करण्याचे काम सुरू होईल. 
  >युवा आयकॉनचे नेटवर्क : कोणत्या ना कोणत्या क्षेत्रात आयकॉन असणाऱ्या युवकांना जोडले जाईल. 
  >ऑनलाइन स्पर्धा : याचे अायोजन होईल. 
  >नेशन विथ नमो लेखक संमेलन : २५ ते ३१ जानेवारीपर्यंत महापालिका स्तरावर राजकीय लिखाण करणाऱ्या लेखकांची परिषद होईल. याच पद्धतीने पक्ष शहरी-निमशहरी युवा लेखकांना जोडले जाईल. 
  >विजय लक्ष्य युवा मेळावा : १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत जिल्हास्तरावर युवा मेळावा होईल. 
  >कमळ युवा महोत्सव : १ ते १५ फेब्रुवारीपर्यंत पक्षासोबत जोडलेल्या युवकांच्या महोत्सवाचे आयोजन होईल. 
  >राज्यस्तरीय टाऊन हॉल : १६ ते २२ फेब्रुवारीपर्यंत विद्यापीठांत याचे आयोजन केले जाईल. 
  >राष्ट्रीय युवा टाऊन हॉल : दिल्लीत पंतप्रधान मोदी २३ फेब्रुवारीला राष्ट्रीय स्तरावर युवकांचा मेळा घेतील. त्यास नमो अॅपद्वारे गावोगावी जोडले जाईल. 
  >पथनाट्य : २४ फेब्रुवारी ते १ मार्चपर्यंत जिल्हा, राज्य, राष्ट्रीय स्तरावर आयोजन होईल. 
  >कमळ संदेश मोटारसायकल महारॅली : २ मार्चला सर्व विधानसभा स्तरावर रॅली काढली जाईल.BJP will campaign for the first voters

Post a Comment

 
Top