0

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी भारतात अल्पसंख्याकांना समान वागणूक मिळत नसल्याचे सांगितले.

  • इस्लामाबाद/नवी दिल्ली- पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी मंगळवारी भारतात अल्पसंख्याकांना समान वागणूक मिळत नसल्याचे सांगितले. त्यांनी पाकचे संस्थापक माेहंमद अली जिना यांच्या जयंतीनिमित्त केलेल्या टि्वटमध्ये म्हटलेय की, भारतात मुस्लिम अल्पसंख्याकांना हिंदू बहुसंख्याकांप्रमाणे दर्जा मिळत नव्हता. ही बाब जिव्हारी लागल्याने जिनांनी नवीन देशासाठी संघर्ष केला. नवे पाकिस्तान जिनांचे पाकिस्तान असेल. भारतात अल्पसंख्याकांना न मिळालेला समान अधिकार अाम्ही पाकमध्ये कसा मिळेल, हे पाहू.जिना यांनी पाकला लाेकशाहीवादी देश बनवले. अल्पसंख्याकांना समान हक्क मिळावा, अशी त्यांची इच्छा हाेती. जिनांचे राजकीय जीवन हिंदू-मुस्लिम एकतेचे दूत म्हणून सुरू झाले हाेते, असेही खान यांनी त्यात म्हटले अाहे. दरम्यान, रविवारी खान यांनी अल्पसंख्याकांना कशी वागणूक दिली जाते, हे अाम्ही माेदींना दाखवून देऊ, असे वक्तव्य केले हाेते. नसिरुद्दीन शहा यांच्या बुलंदशहर हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर केलेल्या विधानावर हे मत व्यक्त केले.
    मोहंमद कैफने म्हटले- फाळणीनंतर पाकमध्ये २०% अल्पसंख्याक हाेते, अाता २ टक्केच 
    इम्रान खानच्या वक्तव्यावर माजी क्रिकेटर मोहंमद कैफने तीव्र प्रतिक्रिया दिली. त्याने ट्विट करत म्हटले की, फाळणीच्या वेळी पाकिस्तानात २० टक्के अल्पसंख्याक हाेते. अाता २ टक्केच राहिले अाहेत. भारतात स्वातंत्र्यानंतर अल्पसंख्याकांची संख्या वाढत अाहे. अल्पसंख्याकांशी कसा व्यवहार करावा, हे सांगणारा पाकिस्तान शेवटचा देश असेल. कैफने हे ट्विट इम्रानलाही केले अाहे.

    २ दिवसांपूर्वी नसिरुद्दीन शहा म्हणाले- इम्रानने अापला देश पाहावा, पाकने भारताकडून शिकावे 
    अभिनेता नसिरुद्दीन शाहने रविवार म्हटले की, इम्रानचा जिथे संबंध नाही, त्या विषयावर त्याने बाेलू नये. त्याने अापल्या देशाचा विचार करावा. भारत ७० वर्षांपासून प्रजासत्ताक अाहे. एआयएमआयएमचे अध्यक्ष व खासदार असदुद्दीन ओवेसींनी ट्विटमध्ये म्हटले हाेते, पाकिस्तानी घटनेनुसार केवळ मुस्लिमच राष्ट्रपती बनू शकताे. भारताने शोषित समुदायाचे राष्ट्रपती पाहिल. पाकने अामच्याकडून शिकावे.
    अहवाल : ७० वर्षांत पाकच्या अल्पसंख्याकांत १७ % घट 
    ‘स्टेट अाॅफ ह्युमन राइट्स इन-२०१७’च्या अहवालानुसार पाकच्या स्वातंत्र्यावेळी तेथील अल्पसंख्याकांची लाेकसंख्या २० % हाेती; परंतु १९९८ च्या जनगणनेनुसार घट हाेऊन ती ३ % झाली. पाकमध्ये दहशतवादी हल्ल्यांनी भलेही कमी मृत्यू झाले असतील; परंतु अल्पसंख्याक हे गर्दीच्या हिंसाचाराचे सर्वात जास्त बळी ठरत अाहेत. तसेच अल्पसंख्याकांच्या हितासाठी बाेलणाऱ्या पत्रकारांवर हल्ले व त्यांचे अपहरण हाेत अाहे.
    ख्रिश्चनांवर हल्ले : ९ वर्षांत ४०० जण ठार; ५०० जखमी 
    पाकमध्ये ईशनिंदा केल्यावरून गत ९ वर्षांत ४०० ख्रिश्चन नागरिक मारले गेले, तर ५०० जण जखमी झाले. डिसेंबर २०१७ मध्ये क्वेट्टात चर्चवरील हल्ल्यात ९ ठार, तर ५७ जखमी झाले हाेते. मार्च २०१६ मध्ये लाहाेरमध्ये ईस्टर डे साजऱ्या करणाऱ्या ख्रिश्चनांवर हल्ला झाला. त्यात ७० ठार, तर जण जखमी झाले. २०१५ मध्ये लाहाेरच्याच अनेक चर्चमध्ये झालेल्या स्फाेटांत १४ ठार, तर ७० जखमी झाले.
    ईशनिंदा: अल्पसंख्याकांना गप्प राहावे लागतेय : अायाेग 
    पाकमध्ये मानवाधिकार अायाेग ही स्वतंत्र निगराणी ठेवणारी संस्था अाहे. देशात ईशनिंदा कायदा लाेकांना चूप राहण्यास भाग पडताेय. ख्रिश्चन, अहमदिया, हजारा, हिंदू व शीख लाेकांवर हल्ले हाेत अाहेत. सिंध प्रांतात हिंदूंची अवस्था वाईट अाहे. तेथील हिंदूंना त्यांच्या मुली-बायकांचे अपहरण व जबरदस्तीने धर्मांतराची चिंता सतावते. भेदभाव सुरूच राहिल्यास ते भारतात जाऊ शकतात, असे अायाेगाने याच वर्षी म्हटले.News about Pakistan

Post a Comment

 
Top