0

सामान्य व्यक्तीला असामान्य बनविण्याचे सामार्थ्य बाळासाहेबांमध्ये होते.


  • मुंबई- शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ‘ठाकरे’ सिनेमाचा ट्रेलर बुधवारी (26 डिसेंबर) वडाळ्यातील कार्निव्हल आयमॅक्समध्ये प्रदर्शित झाला. यावेळी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे, खासदार संजय राऊत यांच्यासह दिग्गज नेते उपस्थित होते.
    बाळासाहेब ठाकरे यांचे व्यक्तिमत्त्व उत्तुंग होते. बाळासाहेबांची भूमिका साकारणे आव्हानात्मक होते, असे अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी याने यावेळी सांगितले. सर्वात कठीण काम अमृता राव हिने केली आहे. अमृता हिने माँ साहेबांची भूमिका केली आहे.
    संजय राऊत यांनी सांगितले की, बाळासाहेबांसोबतचा प्रवास रोमांचक होता. सामान्य व्यक्तीला असामान्य बनविण्याचे सामर्थ्य बाळासाहेबांमध्ये होते. त्यांच्यासोबत जे होते तेही आणि जे त्यांच्यासोबत नसत तेही बाळासाहेबांना समजून घेत होते.
    ठाकरे हा सिनेमा नसून शिवधनुष्य असल्याचे उद्धव ठाकरे यांनी यावेळी म्हटले.
    दरम्यान, ठाकरे सिनेमात अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत आहे. संजय राऊत यांनी ठाकरे सिनेमाची पटकथा लिहिली असून यासाठी त्यांना चार वर्षे लागली. पुढील वर्षी 23 जानेवारी 2019 रोजी म्हणजेच बाळासाहेबांच्या जयंतीला हा सिनेमा बॉक्सऑफिसवर झळकणार आहे. मराठी आणि हिंदी भाषेत हा सिनेमा रिलीज होणार आहे.Thackeray Movie official Trailer Release Updates Nawazuddin Siddiqui Bal Thackeray Shiv Sena

Post a comment

 
Top