0
सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालू ठेवणे ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे.

नवी दिल्ली- लोकप्रतिनिधींनी स्वयंशिस्त ठेवली पाहिजे. तसे झाले तरच सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालू शकते. ही प्रत्येकाची जबाबदारी आहे, असे लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी म्हटले आहे. शुक्रवारीदेखील लोकसभेचे कामकाज तहकूब करावे लागले. दोन दिवस नाताळनिमित्त सुटी असल्याने संसदेचे कामकाज आता थेट २७ डिसेंबरपासून सुरू होणार आहे.

शुक्रवारी महाजन यांच्या अध्यक्षतेखाली लोकसभेच्या आचारसंहिता समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर महाजन पत्रकारांशी बोलत होत्या. सभागृहाचे कामकाज सुरळीत राहावे यासाठी सर्व पक्षांनी सहकार्य करणे अपेक्षित आहे. लोकांनी निवडून दिल्यानंतर सर्व सभागृहाचे सदस्य बनले. आपण लोकांचे प्रतिनिधी आहोत, याचे भान कोणीही सोडू नये. मल्लिकार्जुन खरगे यांनी २७ डिसेंबर रोजी ट्रिपल तलाकच्या विधेयकावर चर्चेस काँग्रेस तयार असल्याचे विधान केले होते. त्यासंदर्भात महाजन म्हणाल्या, २७ डिसेंबरपासून सभागृहाचे कामकाज सुरळीत राहील, अशी अपेक्षा आहे. तत्पूर्वी देखील कामकाजात अडथळा आला होता.MPs should keep themselves autonomous; Mahajan again appealed

Post a Comment

 
Top