0
एका गावामध्ये एक गुरु आपल्या शिष्यांसोबत राहत होते. गुरुजींचा एक शिष्य खूपच आळशी होता. गुरुजीने त्यालावेळेचे महत्त्व समजावण्यासाठी त्या आळशी शिष्याला बोलावले आणि काळा दगड देऊन म्हणाले, मी दोन दिवसासाठी गावाबाहेर जात आहे. हा दगड खूप चमत्कारी आहे. या दगडाचा लोखंडाच्या वस्तूला स्पर्श झाल्यास ती वस्तू सोन्याची होईल.


हा दगड 2 दिवस तुझ्याकडे ठेव आणि मी परत आल्यानंतर माझ्याकडे दे. असे सांगून गुरुजी निघून गेले. शिष्याला दगड पाहून खूप आनंद झाला. त्याने विचार केला की, या दगडाने मी खूप सोने तयार करेल आणि माझी प्रत्येक इच्छा पूर्ण होईल.


शिष्याने असाही विचार केला की, माझ्याकडे दोन दिवस आहेत मग मी उद्या काम सुरु करेल. आज आराम करतो. एक दिवस असाच निघून गेला. दुसऱ्या दिवशी त्याने दुपारी बाजारात जाऊन खूप लोखंड खरेदी करावे असा विचार केला. दुपार झाल्यानंतर त्याने विचार केला, आधी जेवण करावे आणि मग बाजारात जावे.


जेवण केल्यानंतर त्याला झोप लागली. त्याने थोड्यावेळाने जाण्याचा विचार केला. थोड्यावेळाने झोपेतून उठल्यानंतर सूर्यास्त होणार असल्याचे त्याला दिसले. गुरुजी आजच येणार असल्याचे त्याला आठवले. तो धावत बाजाराकडे निघाला आणि त्यावेळी गुरुजी त्याच्यासमोरच उभे होते. हे पाहून त्याला आपल्या अळशीपणाचा खूप राग आला.


लाइफ मॅनेजमेंट
तुम्हाला तुमच्या आयुष्यात काही साध्य करायचे असल्यास उद्याची वाट पाहू नका. जे काही करायचे आहे ते आजपासूनच सुरु करा. कारण निघून गेलेली वेळ पुन्हा येत नाही. अनेकवेळा उद्याच्या नादात महत्त्वाची कामे हातातून निघून जातात आणि पश्चाताप करण्याशिवाय काहीही शिल्लक राहत नाही
Motivational Story in marathi

Post a Comment

 
Top