0
काँग्रेस प्रभारी पीएल पुनिया यांनी याबाबतचे संकेत दिले आहेत.

रायपूर / नवी दिल्ली - छत्तीसगड विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्याच्या तीन दिवसानंतरही काँग्रेसने मुख्यमंत्री पदाचा निर्णय घेतलेला नाही. काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या दिल्लीतील निवासस्थानी या मुद्द्यावर शुक्रवारी दिवसभर चर्चा झाली. पर्यवेक्षक मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, की राहुल यांच्याशी सगळेच बातचीत करत आहेत. निर्णय तेच घेतील. छत्तीगडचे काँग्रेस प्रभारी पीएल पुनिया यांनी शनिवारी मुख्यमंत्री पदावर निर्णय जाहीर केला जाणार अशी शक्यता वर्तवली आहे.


राहुल गांधींनी छत्तीसगड प्रदेशाध्यक्ष भूपेश बाघेल, टीएस सिंह देव, चरणदास महंत आणि ताम्रध्वज साहू यांना दिल्लीत बोलावून घेतले होते. काँग्रेस अध्यक्षांनी शुक्रवारी सीएम पदाचे दावेदार असलेल्या प्रत्येक नेत्याशी एका बंद खोलीत एक-एक करून चर्चा केली. यानंतर पर्यवेक्षक मल्लिकार्जुन खरगे आणि प्रदेशाचे प्रभारी पीएल पुनिया यांच्याशीही बातचीत केली.

उप-मुख्यमंत्री, 5 मंत्री द्या -आदिवासी समुदायाची मागणी
छत्तीसगडच्या गोंडवाना गोंड महासभेचे महामंत्री सोहन पोटाई यांनी कांग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या बातचीत केली. तसेच आदिवासी समुदायातून 6 मागण्या पूर्ण करण्यास सांगितले आहे. त्यांच्या मागणीनुसार, या राज्यात आदिवासी समुदायाला मुख्यमंत्री मिळत नसेल तर मंत्रिमंडळात 5 आदिवासी मंत्र्यांना जागा द्यावी. तसेच एकाला उप-मुख्यमंत्री करण्यात यावे. बस्तर जिल्ह्यातील आदिवासींनी काँग्रेसवर विश्वास दाखवला आता काँग्रेसनेही त्यांच्या मागण्या मान्य करून आदिवासींना प्रतिनिधित्व द्यावे असे पोटाई यांनी सांगितले आहे.CM of chhattisgarh to be declared tday after meeting with congress leaders

Post a comment

 
Top