संतोष पाटील हे गिरणा नदीकडे शेतात जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला.
जळगाव- जळगाव महापालिकेचे माजी नगरसेवक संतोष पाटील यांच्यावर सोमवारी (ता.31) सकाळी मोटारसायकल वरून आलेल्या दोघा अज्ञात व्यक्तींनी गोळी झाडली. संतोष पाटील यांच्या छातीत गोळी घुसली आहे. त्यांना तातडीने उपचारासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे दाखल करण्यात आले आहे. ही घटना सकाळी साडे दहा वाजता घडली.
संतोष पाटील हे गिरणा नदीकडे शेतात जात असताना त्यांच्यावर हल्ला झाला. संतोष पाटील यांच्यावर हल्ला झाल्याची माहिती मिळताच त्यांचे समर्थकांनी तसेच भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी प्रचंड गर्दी केली आहे.
संतोष पाटील यांनी नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या पत्नी भाजपच्या नगरसेविका आहेत.

Post a Comment