0
निर्देशांचे उलंघन करत हरकत अर्जावर योग्य कार्यवाही न करता हरकतीचा अर्ज नामंजूर केल्याचा आक्षेप

नगर- महापालिकेच्या निवडणुकीत प्रभाग ९ मधून अपक्ष निवडून आलेल्या श्रीपाद छिंदमची निवड रद्द करण्याची मागणी करणारी याचिका मावळा प्रतिष्ठानचे अध्यक्ष नीलेश म्हसे यांनी गुरुवारी जिल्हा न्यायालयात दाखल केली. नीलेश म्हसे यांनीही प्रभाग ९ मधून अपक्ष निवडणूक लढवली हाेती. याच प्रभागातून छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बेताल वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम रिंगणात होता.

दरम्यान, निवडणुकीत अर्ज छाननीची प्रक्रिया सुरू असताना म्हसे यांनी छिंदमसह इतर उमेदवारांच्या नामनिर्देशनपत्रातील त्रुटींबाबत हरकत घेतली होती. त्यावर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी सुप्रीम कोर्ट व निवडणूक आयोगाच्या निर्देशांचे उलंघन करत हरकत अर्जावर योग्य कार्यवाही न करता हरकतीचा अर्ज नामंजूर केला, असा म्हसे यांचा अाक्षेप अाहे.Petition against Chhindham by Nilesh Mhase

Post a comment

 
Top