0
बुलंदशहर हिंसाचार प्रकरणी पोलिसांकडून फरार १८ संशयित आरोपींची छायाचित्र जाहीर करण्यात आली. पोलिसांकडून या १८ जणांची संपत्ती जप्‍त करण्याचे आदेश दिले आहेत. या हिंसाचारप्रकरणी अजामीनपात्र वॉरंटही जारी करण्यात आला आहे. हिंसाचार प्रकरणाचे तपास करणार्‍या वरिष्ठ पोलिस अधिकार्‍यांनी मुख्य आरोपी योगेश राज आणि युवा मोर्चा भाजपचा अध्यक्षाबरोबरच ७६ जणांविरोधात गुन्‍हा दाखल केला आहे तर अन्‍य दोघांना अटक करण्यात आले आहे. हिंसाचार प्रकरणात अकरा जणांना पोलिस कोठडी देण्यात आली आहे.
याआधी बुलंदशहर हिंसाचारात ठार झालेले पोलिस निरीक्षक सुबोध कुमार सिंह यांच्या हत्‍याप्रकरणी जितू फौजी याला न्यायालयीन कोठडीत पाठवण्यात आले आहे. न्यायालयात त्याने माझी फसवणूक झाल्याचे सांगून मी पळून जाणारा नाही असेही सांगितले आहे.

Post a Comment

 
Top