0
सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद

औरंगाबाद- शहराच्या विविध भागात राहणाऱ्या दोघांनी गळफास घेऊन, तर एकाने विष प्राशन करून आत्महत्या केली. या तिन्ही घटना १५ डिसेंबर रोजी घडल्या असून संबंधित पोलिस ठाण्यांत याची नोंद करण्यात आली आहे

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, श्यामलाल भोजीराम शेळके (३०, रा. संजय गांधी मार्केट, टीव्ही सेंटर) याने सायंकाळी पाच वाजता राहत्या घरी साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी सिडको पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दुसऱ्या घटनेत अजिंक्य अशोक हजारे (१७, रा. बजाजनगर, एमआयडीसी, वाळूज) याने छताला दोरी बांधून दुपारी दीड वाजेच्या सुमारास गळफास घेतला. त्याला तत्काळ खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले. तिसऱ्या घटनेत, नामदेव नरसिंग बड्डे (६४, रा. बजाजनगर, वाळूज) या वृद्धाने राहत्या घरी विष प्राशन केले होते. त्यांना उपचारासाठी जालना रोडवरील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला.

याप्रकरणी एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तिघांच्या आत्महत्येचा तपास पोलिस करत आहेत.
Suicide case in Aurangabad

Post a comment

 
Top