0
अंबाजोगाईत कुंटणखान्यावर छापा व्यवस्थापक, आंटी, ३ ग्राहकांना अटक

अंबाजोगाई- अंबाजोगाईतील अण्णाभाऊ साठे चौकातील न्यू संतोष लॉजमध्ये सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक पथकाच्या पोलिसांनी शुक्रवारी दुपारी एक पंटर पाठवून अचानक छापा मारला. या छाप्यात पोलिसांची चाहूल लागताच लॉजमालक असलेला सेवानिवृत्त नायब तहसीलदार पसार झाला असला तरी झडतीत तीन खोल्यांतून तीन ग्राहकांसह लॉजचा व्यवस्थापक, आंटी अशा पाच जणांना अटक केली. या छाप्यात तीन महिलांची सुटका केली आहे . पोलिसांनी लॉजमालकासह त्याचा व्यवस्थापक, आंटी आणि तीन ग्राहक अशा सहा जणांवर गुन्हा नोंदवला आहे.

अंबाजोगाई येथील अण्णाभाऊ साठे चौकात सेवानिवृत्त नायब तहसीलदार आश्रुबा भाऊराव सारूक यांच्या मालकीचा न्यू संतोष लॉज आहे. या ठिकाणी लॉजमालक सारूक, लॉज व्यवस्थापक दत्तात्रय रामभाऊ मुंडे आणि आंटी अनिता रमेश जगताप हे तिघे संगनमताने महिलांना आर्थिक आमिष दाखवून त्यांच्याकडून वेश्याव्यवसाय करून घेत असल्याची माहिती बीडच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेला मिळाली होती. या माहितीवरून पथकातील पोलिसांनी पंच म्हणून सामाजिक कार्यकर्त्या मनीषा तोकले आणि किरण डोळस यांच्यासह शुक्रवारी अंबाजोगाई येथे जाऊन दुपारी २.३० वाजता लॉज परिसरात सापळा रचला. एका पंटरला लॉजमध्ये पाठवले. पंटरने आत जाऊन इशारा करताच परिसरात दबा धरून बसलेल्या पोलिसांनी लॉजवर अचानक छापा मारला. या वेळी पोलिसांची चाहूल लागताच लॉजमालक आश्रुबा सारूक हा पसार झाला. याच वेळी पोलिसांनी लॉजची झडती घेतली असता वेगवेगळ्या तीन खोल्यांतून हनुमान मदनराव सोनवणे (२८, रा. लोणी, ता. परळी), सिद्धेश्वर जालिंदर पाडुळे (२४, रा. दगडवाडी, ता. अंबाजोगाई) आणि फिरोज मुसा दंडिये (रा. बर्दापूर, ता. अंबाजोगाई) या तीन ग्राहकांना तीन महिलांसोबत अश्लील चाळे करताना रंगेहाथ पकडले. यानंतर या तीन महिलांची सुटका केली. पोलिसांनी तीन ग्राहकांसह लॉजचा व्यवस्थापक दत्तात्रय रामभाऊ मुंडेला ताब्यात घेतले, तर आंटी अनिता जगताप हिला बसस्थानक परिसरातून अटक केली.

११ महिन्यांत १२ छापे
अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्ष जिल्ह्यात कारवाया करत आहे. ११ महिन्यांत १२ छापे टाकून कारवाया केल्या आहेत. नागरिकांनीही पोलिसांना माहिती देऊन सहकार्य करावे. पोलिस निश्चित कारवाया करतील, असे अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षाचे पोलिस उपनिरीक्षक भारत माने यांनी सांगितले.

सहा जणांवर गुन्हा
या प्रकरणी सपोनि शिवाजी भारती यांच्या तक्रारीवरून आश्रुबा सारूक, आंटी अनिता जगताप, व्यवस्थापक दत्तात्रय मुंडेंसह तीन ग्राहकांवर अंबाजोगाई शहर पोलिसांत गुन्हा नोंदवला. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर, अपर अधीक्षक अजित बोऱ्हाडे, प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधीक्षक रोशन पंडित, फौजदार भारत माने, महिला पोलिस उगले, घोडके, पोलिस बहिरवाळ, शेख, मिसाळ, कदम यांनी केली.

परवाना रद्द करावा
या लॉजवर उघडपणे वेश्याव्यवसाय सुरू असतो. यापूर्वी अनेकदा या लॉजवर टाकलेल्या छाप्यात महिला आढळून आल्यात. शुक्रवारी दुपारी या लॉजवर २० ते २५ महिला असल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मात्र, बीडच्या पथकाने टाकलेल्या छाप्यात तिघे आढळल्याचे पोलिसांनी सांगितले. या लॉजचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्यात यावा. Three women rescued; Lawmaker retired tehsildar absconding

Post a Comment

 
Top