नगर- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी भोवळ येऊन व्यासपीठावर कोसळल्याची घटना शुक्रवारी घडली. राहुरी कृषी विद्यापीठात पदवी प्रदान समारंभात ही घटना घडली. गडकरींना डॉक्टरांनी इंजेक्शन दिल्यानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सूत्रांनी सांगितले.
'लो शुगरमुळे प्रकृतीला थोडा त्रास झाला. मात्र वैद्यकीय तज्ज्ञानी लगेच उपचार केले व मी आता ठीक आहे. सर्व हितचिंतकांचा मी आभारी आहे.'
- नितीन गडकरीमिळालेली माहिती अशी की, राहुरी येथील महात्मा फुले कृषी विद्यापीठातील पदवी प्रदान समारंभाला नितीन गडकरी उपस्थित झाले होते. राष्ट्रगीताने या कार्यक्रमाची सांगता होणार होती. गडकरींचे भाषण सुरु झाल्यानंतर राष्ट्रगीत सुरु असताना ते व्यासपीठावर कोसळले. राज्यपाल सी.विद्यासागर राव यांनी गडकरींना सावरल्याने मोठा अनर्थ टळला. गडकरी यांच्यावर उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थीर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. यामुळे प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली.गडकरींचे ट्वीट..'शुगर कमी झाल्याने प्रकृती बिघडली. माझी प्रकृती उत्तम आहे. काळजी करण्यासाठी काही कारण नाही.'नियोजित दौरा पूर्ण करणार..शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेणारगडकरी विशेष विमानाने नागपूरला रवाना होणार होते. मात्र गडकरींनी आपली प्रकृती उत्तम असल्याचे सांगत दौरा पूर्ण करणार असल्याचे म्हटले. त्यामुळे तूर्तास तरी ते आता नागपुरात परतणार नाही. गडकरी यांनी शिर्डीत साईबाबांचे दर्शन घेतले. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. राहुरी कृषी विद्यापीठात पदवी प्रदान समारंभात देण्यात आलेल्या ड्रेसमुळे श्वास गुदमल्याने थोडासा त्रास झाला. परंतु मी ठणठणीत असल्याचे गडकरींनी पत्रकारांना सांगितले.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment