काँग्रेसला हमी राज्यातील आघाडीवर या समीकरणाचा परिणाम नाही
नगर- अहमदनगर महापालिकेत अवघ्या १४ जागा घेऊन तिसऱ्या क्रमांकावर असलेल्या भाजपला पाठबळ देत राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी पालिकेची सत्ता दिली. याची पक्षाने गंभीर दखल घेतली असल्याचे सांगून पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी या नगरसेवकांवर कारवाईचे संकेत रविवारी येथे दिले. नगर महापालिकेतील या समीकरणाचा राज्यातील काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीवर परिणाम होणार नाही, अशी हमी पवार यांनी दिली.
पवार म्हणाले, 'भाजपबरोबर जाऊ नका, असे मी स्पष्ट सांगितले होते. पक्षाध्यक्षांनी सूचना देऊनही हा निर्णय घेतला असेल तर तो कदापिही स्वीकारार्ह नाही. याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. संबंधितांवर कारवाई होईल.' या नगरसेवकांकडून खुलासा मागवला असल्याचे पवार यांनी सांगितले. येथील जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या शताब्दी महोत्सवासाठी पवार शहरात होते. या समारंभानंतर पवार यांनी पत्रकारांशी संवाद साधला.कर्जमाफीला पंतप्रधान मोदी चक्क लॉलीपॉप म्हणतात...
चार राज्यांच्या निवडणुकीत सत्ता मिळाल्यानंतर मध्य प्रदेश, राजस्थान व छत्तीसगड सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय जाहीर केला. पंतप्रधानांनी मात्र हा लॉलीपॉप असल्याचे सांगत या निर्णयाची चेष्टा केली. खरे तर धाडसी निर्णय घेणाऱ्या या राज्यांना केंद्राने आर्थिक मदत देऊन शक्ती देण्याची गरज होती. परंतु 'लॉलीपॉप' संबोधून पंतप्रधानांनी वजावट करण्याचा प्रयत्न केला, अशी टीका पवारांनी केली. शेतकरी वर्गासाठी केंद्राचे धोरण सहानुभूतीचे नाही, हे स्पष्ट झाल्याचे पवार म्हणाले.
देशात आणीबाणीसदृश स्थिती
रिझर्व्ह बँकेसारख्या स्वायत्त संस्थेत हस्तक्षेप होतो. न्यायालय, सीबीआयवर हल्ले सुरू आहेत. ऑगस्टा वेस्टलँड हेलिकॉप्टर खरेदी प्रकरणात दलाल मिशेल याच्या आडून विरोधकांना नाउमेद करण्याचा प्रयत्न होत आहे. यासाठी यासाठी सत्तेचा गैरवापर सुरू आहे. हे पाहता देशात आणीबाणीसदृश स्थिती निर्माण झाल्याचे दिसत आहे. याविरुद्ध लढावे लागेल, असे पवार म्हणाले.१०-२१ दिवसांची मुदत :
नगरसेवकांना याबाबत पक्षाच्या वतीने नोटिसा बजावण्यात आल्या असून खुलासा देण्यासाठी दहा ते बारा दिवसांची मुदत देण्यात आली आहे. पक्षाच्या शहराध्यक्षांकडूनही माहिती मागवली आहे. नगरसेवकांना सल्ला कुणी दिला याची माहिती घेत असल्याचे पवार यांनी नमूद केले.
जिल्हा मराठा विद्याप्रसारक संस्थेच्या कार्यक्रमात बाेलताना शरद पवार.४-५ जानेवारीला निर्णय
सर्व माहिती हाती आल्यानंतर ४ किंवा ५ जानेवारीला बैठकीत नगरसेवकांबाबत निर्णय घेणार असल्याचे सांगून पक्षादेशाविरुद्ध निर्णय स्वीकारार्ह नाही, असेही पवार यांनी बजावले. प्रदेशाध्यक्षांनी स्थानिक पातळीवर स्पष्ट सूचना दिल्या होत्या. भाजपला पाठिंबा द्यायचा नाही, असे ठरले होते. स्थानिक आमदार येऊन भेटले. त्यांनी परिस्थिती सांगितली. तरीही माझा नकारच होता, असे पवार म्हणाले.सीट बेल्ट अडकल्याने इमर्जन्सी लँडिंग...
सीट बेल्ट दरवाजात अडकल्याने पवार प्रवास करत असलेल्या हेलिकॉप्टरचे नगरमध्ये इमर्जन्सी लँडिंग करावे लागले. या प्रकारामुळे काही वेळ प्रशासन हवालदिल होते. नगरमधून पुण्याला जाण्यासाठी हेलिकॉप्टर निघाले. मात्र, काही क्षणांत पायलटला सीट बेल्ट अडकल्याचे लक्षात आले.
Post a Comment