0
एका गावात एक साधू राहत होते, ते जेव्हा-जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा, एके दिवशी शहरातून 4 मुलं आले, ते म्हणाले-

  • एका गावामध्ये एक साधू राहत होता. हे साधू जेव्हा-जेव्हा नाचायचे तेव्हा पाऊस पडायचा. गाकरीसुद्धा साधूवर खूप खुश होते. जेव्हाही गावकऱ्यांना पाऊस पडावा असे वाटत होते, तेव्हा जाऊन साधूला नाचायला सांगायचे आणि साधू नाचताच पाऊस पडायचा.

    > एके दिवशी त्या गावामध्ये 4 तरुण आले. गावकऱ्यांनी या तरुणांना चमत्कारी साधूंविषयी सांगितले. त्या मुलांना यावर विश्वासच बसत नव्हता. त्यानंतर गावकरी त्या मुलांना घेऊन साधूकडे गेले. साधुसमोरही मुलांनी हे अशक्य असल्याचे सांगितले.

    > मुले म्हणाली- आज आम्ही नाचतो, आमच्या नाचण्यानेही पाऊस पडेल. मुलांनी एक-एक करून नाचण्यास सुरुवात केली. पहिला मुलगा 10 मिनिट नाचला परंतु पाऊस पडला नाही, दुसरा मुलगा अर्धा तास नाचला तरीही पाऊस पडला नाही अशाप्रकारे इतर दोन मुलेही नाचले परंतु पाऊस पडला नाही.

    > आता साधू नाचू लागले परंतु 2 तास झाले तरीही पाऊस पडला नाही. अशाप्रकारे साधू नाचत-नाचत संध्याकाळ झाली आणि अचानक ढग गरजू लागले आणि थोड्याच वेळात पाऊस पडू लागला. हे पाहून मुले अचंबित झाली.

    > मुलांनी या चमत्कारामागचे कारण विचारल्यानंतर साधूने सांगितले की- एक तर या गावकऱ्यांचा माझ्यावर अतूट विश्वास आहे आणि माझा देवावर. दुसरे कारण पाऊस पडत नाही तोपर्यंत मी नाचत राहतो, मग कितीही उशीर झाला तरी मी नाचणे थांबवत नाही.

    लाईफ मॅनेजमेंट
    जेव्हा तुम्ही एखादे नवीन काम सुरु करता तेव्हा अनेकवेळा अपयश पदरी पडते. त्या अपयशामुळे तुम्ही काम करण्याचा प्रयत्न बंद करता. याउलट काही लोक यश प्राप्त होत नाही तोपर्यंत प्रयत्न करतात. अपयशाला घाबरू नये उलट त्यामधून यशस्वी होण्यासाठी आपण आणखी काय करावे याचा बोध घ्यावा. स्वतःवर पूर्ण विश्वास असल्यास काहीही अशक्य नाही.Inspirational Stories Motivation Story in marathi

Post a Comment

 
Top