आयटी क्षेत्राची ट्रेड असोसिएशन नॅसकॉमनुसार देशात गेम डेव्हलपमेंटशी निगडित सुमारे १०० कंपन्या आहेत.
बिझनेस डेस्क- देशात पबजी गेम म्हणजेच ‘प्लेयर अननोन्स बॅटल ग्राउंड’ची प्रसिद्धी पाहून चिनी कंपनी टॅनसेंटने प्लेटोनियाच्या भागीदारीने अलीकडेच बंगळुरूत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी एक स्पर्धा आयोजित केली. त्यात देशातील ३० शहरांतून एक हजारपेक्षा जास्त महाविद्यालयांच्या सुमारे अडीच लाख स्पर्धकांनी नाेंदणी केली. याहूनही महत्त्वाची बाब म्हणजे, स्पर्धेच्या एकूण बक्षिसांची रक्कम ५० लाख रुपये ठेवली गेली हाेती.
पबजी हे असे एकमेव उदाहरण नाही, ज्यातून ई-स्पोर्ट्स म्हणजे मोबाइल गेमिंगची बाजारपेठ देशात नवी उंची गाठत असल्याचे स्पष्ट हाेते. जगभरात २.३४ अब्ज गेमर्ससाेबत गेमिंग उद्याेगाने स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्यासाठी एक दीर्घ प्रवास केला आहे. आयटी क्षेत्राची ट्रेड असोसिएशन नॅसकॉमनुसार देशात गेम डेव्हलपमेंटशी निगडित सुमारे १०० कंपन्या आहेत. आज या इंडस्ट्रीमध्ये प्रोग्रामर्स व डिझायनर्सपासून ते ऑडिओ इंजिनिअर्सपर्यंतच्या विविध व्यावसायिकांना खूप मागणी आहे. या उगवत्या क्षेत्रात तुम्हीदेखील स्वत:च्या करिअरचा शाेध घेऊ शकता.
गेम डिझायनर
गेम्सचे आर्किटेक्ट्स असणारे हे व्यावसायिक गेमशी संबंधित एलिमेंट्ससाठी योजना तयार करण्यापासून ते सेटिंगपर्यंतचे काम करत असतात. तसेच गेमचे नियम ठरवण्यासह त्यासाठी वातावरणनिर्मिती व कथानक तयार करून वेगवेगळ्या लेव्हल (पातळी) सेट करतात. या क्षेत्रात प्रवेशासाठी गेम डिझायनिंगमध्ये बॅचलर डिग्री, संगणक अभियांत्रिकी किंवा संगणक विज्ञानात बीटेक करून तुम्ही गेम डिझायनर बनू शकता.
नॅरेटिव्ह डिझायनर
काेणत्याही खेळात (गेम) कथेला कॉन्टेक्स्ट जोडण्यासाठी एखाद्या पात्रास (कॅरेक्टर) काेणत्या जागी सेट करायचे व कथेचा पुढील टप्पा काय असेल, जिंकल्यानंतर खेळाडूला काय मिळेल आदी सारे ठरवण्याचे काम एक नॅरेटिव्ह डिझायनर करत असताे. हे व्यावसायिक पात्रांसाठी संवादलेखन करून ते गेम्समध्ये सेट करतात. इंग्रजी साहित्य किंवा मास कॉममध्ये बॅचलर डिग्रीसह रचनात्मक लेखन वा कथा-पटकथालेखनाचे प्रमाणपत्र मिळवून नॅरेटिव्ह डिझायनर बनू शकता.
व्हिज्युअल आर्टिस्ट
हे व्यावसायिक गेममधील पात्रांना रंग-रूप व आकार (फिजिकल स्ट्रक्चर) देण्याचे काम करून ते इतर पात्रांपेक्षा वेगळे दाखवण्याचाही प्रयत्न करतात. साेबतच अनेक प्रकारचे इफेक्ट्सही देतात व पात्रांच्या हालचालींची पद्धतही निश्चित करतात. काॅम्प्युटर ग्राफिक्स, आर्ट, अॅनिमेशन किंवा मग इल्युस्ट्रेशनमधील बॅचलर डिग्री मिळवून तुम्ही यात पुढे जाऊ शकता.
ऑडिओ इंजिनिअर
या व्यावसायिकांना ट्रॅफिक साउंड, क्राऊड नॉइझ, पक्ष्यांच्या किलबिलाटासह काेणत्याही गेममध्ये साउंड इफेक्ट टाकून त्या गेमला वास्तव रूप द्यावे लागते. हे अनेक प्रकारच्या साउंड इफेक्ट्सना एकत्र करून ऑडिओ तयार करतात. या पदासाठी साउंड इंजिनिअरिंग किंवा ऑडिओग्राफीमधील बॅचलर डिग्री गरजेची असते.
गेम डेव्हलपर किंवा प्रोग्रामर
गेमच्या संकल्पनेला प्रवाही ठेवण्यासाठी त्यात टेक्निकल कोड्स टाकण्याचे काम हे लाेक करतात. तसेच गेम आर्टिस्ट्स, गेम डिझायनर्स, गेम प्रोड्यूसर्स व साउंड टेक्निशियन्ससाेबत काम करतात. यासाठी गेम प्रोग्रामिंग किंवा गेम डेव्हलपमेंटमध्ये बॅचलर डिग्री वा संगणक विज्ञानात बीई, बीटेक किंवा काॅम्प्युटर अॅप्लिकेशनमधून बॅचलर डिग्री असावी.
गेम टेस्टर
हे व्यावसायिक गेम्सची विविध स्तरांवर चाचणी आणि परफॉर्मन्सचे विश्लेषण करून बग्ज शाेधणे व ते ओळखण्यासह गेम्समध्ये बदल करण्याचे सुचवत असतात. या पदासाठी संगणक विज्ञानातून बीई किंवा बीटेक करावे लागते. यासह तुमच्याकडे आयएसटीक्यूबी प्रमाणित टेस्टरचे प्रमाणपत्र असणेही गरजेचे असते.
डेव्हऑप्स इंजिनिअर
ऑनलाइन गेमिंगच्या वाढत्या क्रेझसह नेटवर्क्स व सर्व्हर्स क्रिएट आणि मेंटेन करण्यासाठी या अभियंत्यांना मागणी वाढली आहे. या पदासाठी संगणक विज्ञान-अभियांत्रिकीतील बीटेक किंवा बीईची पदवी मिळवावी लागते.

Post a Comment