0
मृत व आरोपी हे एकमेकांचे आतेभाऊ लागतात.

  • शेवगाव- शिवीगाळ केली म्हणून जाब विचारण्यास गेलेल्या एकाचा चाकूने भोसकून खून करण्यात आला. ही घटना तालुक्यातील वडुले बुद्रूक येथे घडली. संदीप दत्तात्रेय जर्गे (३०, वडुले बुद्रूक) असे मृताचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी ज्ञानेश्वर चंद्रकांत काळे यास अटक केली आहे. त्याच्याविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मृत व आरोपी हे एकमेकांचे आतेभाऊ लागतात.
    मृताचा भाऊ अमोल जर्गे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ७ ऑगस्ट रोजी आरोपी ज्ञानेश्वरने दारुच्या नशेत त्याचा भाऊ धनंजय व वडील चंद्रकांत काळे यांना मारहाण केली होती. त्यावेळी धनंजयने भावाविरुध्द दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी गुन्हा दाखल करुन १५ ऑगस्टला अटक केली होती. तो अटकेत असताना संदीप आरोपीला भेटण्यासाठी गेला होता. त्यावेळी आरोपीने संदीपला जामीन होण्यासाठी गळ घातली होती. मात्र, संदीपने त्यास नकार दिला होता.
    त्यानंतर शनिवारी सायंकाळी ७.३० वाजता आरोपी ज्ञानेश्वरने संदीपला फोनवरुन त्यावेळी जामीन का झाला नाही, असे म्हणत शिवीगाळ केली. विनाकारण शिवीगाळ का करतो असे विचारण्यासाठी संदीप, त्याचे भाऊ बापू व अमोल जर्गे आरोपी ज्ञानेश्वर काळे याच्या घरी गेले. आरोपीने संदीप यास शिवीगाळ करत पायाला चावा घेतला.
    संदीपचा भाऊ बापू भांडण सोडवण्यासाठी गेला असता त्याच्या पाठीलाही चावा घेतला. ज्ञानेश्वरने चाकू काढून संदीपच्या छातीत मारला. यात गंभीर जखमी झालेल्या संदीपला दवाखान्यात नेले, मात्र उपचारांपूर्वीच तो मरण पावला.Murderd case in Shevgoan

Post a Comment

 
Top