शूटिंग करुन लॉस एंजिल्स येथे पोहोचणार
- बॉलिवूड डेस्क. जोधपुरमध्ये शाही अंदाजात लग्न केल्यानंतर निक जोनस आणि प्रियांका चोप्राचे आतापर्यंत तीन रिसेप्शन झाले आहेत. दिल्ली आणि मुंबईमध्ये दोन रिसेप्शननंतर आता चौथे रिसेप्शनही होणार आहे. हे रिसेप्शन लॉस एंजिल्समध्ये प्रियांका आणि निकच्या हॉलिवूड चाहत्यांसाठी होणार आहे. मीड डे न्यूपेपरच्या वृत्तानुसार हे रिसेप्शन जानेवारी 2019 च्या अखेरीस होऊ शकते.
पाहूणे म्हणून हे होऊ शकतात सहभागी
निक प्रियांकाच्या फायनल वेडिंग रिसेप्शनमध्ये कैरी वॉशिंगटन, ट्वेन जॉनसन, एलेन डेजेनर्स आणि मेगन मार्केल सहभागी होऊ शकतात. प्रियांकाचा हॉलिवूड चित्रपट ए किड लाइक जॅक आणि इजन्ट इट रोमंटिकचे को-स्टार्सही रिसेप्शन अटैंड करतील. प्रियांकाचे कुटूंब आणि बहीण परिणितीही लॉस एंजिल्समध्ये रिसेप्शन अटेंड करणार आहेत.शूटिंग करुन लॉस एंजिल्स येथे पोहोचणार
स्विटजरलँडच्या हनीमूनवरुन परतल्यानंतर प्रियांका आपल्या द स्काय इज पिंकची शूटिंग करण्यासाठी भारतात परतणार आहे. यानंतर जानेवारीमध्ये लॉस एंजिल्समध्ये पोहोचणार आहे. येथे महिन्याच्या अखेरीस वेडिंग रिसेप्शनचे आयोजन असणार आहे. मालीबूमध्ये वेन्यू फायनल होण्याची शक्यता आहे. यामध्ये निक प्रियांकाचे जवळचे मित्र सहभागी होतील.
Post a Comment