0
'तू दरवर्षी शिर्डीला पायी पदयात्रेला जातो तेव्हा तुला मित्रांच्या मदतीने जिवे मारू' अशी धमकी दिली

पंचवटी : खंडणीच्या गुन्ह्यात पोलिसांनी अटक केलेला सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे याने तक्रारदाराला तुरुंगातून सुटून आल्यावर गोळ्या घालण्याची धमकी दिल्याचा धक्कादायक प्रकार पंचवटी पोलिस ठाण्याच्या आवारात घडला. संशयिताच्या विरोधात पंचवटी पोलिस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांनी दिलेली माहिती आणि अजय गरुड (रा. वृंदावन कॉलनी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सराईत गुन्हेगार तुकाराम चोथवे ऊर्फ तुक्या हा पल्सर दुचाकीने वृंदावन कॉलनी येथे अाला. शिवीगाळ करत मारहाण करत दोन लाखांची खंडणी मागितली. चोथवेचे मित्र संशयित विकी भास्कर, पप्पू शेवरे, सुमीत काळे यांनी शिवीगाळ करत 'तुझा काटा काढून टाकू', असे बोलत तुकाराम चोथवे याने पिस्तूल काढून गरुड यांच्या दिशेने रोखत 'तू दरवर्षी शिर्डीला पायी पदयात्रेला जातो तेव्हा तुला मित्रांच्या मदतीने जिवे मारू' अशी धमकी दिली. गरुड यांनी खंडणी मागितल्याची तक्रार पंचवटी पोलिसांत दिली होती. या तक्रार अर्जाच्या आधारे पोलिसांनी संशयित चोथवेला अटक केली. त्याला पोलिस वाहनातून न्यायालयात घेऊन जात असताना वाहनातून तक्रारदाराला धमकी देत जेलमधून सुटून आल्यानंतर गोळ्या घालण्याची धमकी दिली. विशेष म्हणजे त्याला न्यायालयात घेऊन जाणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समोरच हा प्रकार घडल्यानंतर तक्रारदाराने आश्चर्य व्यक्त केली. २०१४ मध्ये समीर हांडे खून प्रकरणात त्याला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे.

उच्च न्यायालयाने अटी व शर्तीवर जामीन मंजूर केला आहे. पंचवटी पोलिसांकडून जामीन अर्जाला हरकत घेण्यात येणार असल्याची माहिती वरिष्ठ निरीक्षक मधुकर कड यांनी दिली.The ransom of Rs. 2 lakh demanded

Post a Comment

 
Top