0
मानसिक त्रास देण्यासाठी ही वाहने जाळत असल्याची कबुली दिली.

जालना- मानसिक त्रास देण्याच्या उद्देशाने कन्हैयानगर भागात सहा ते सात वाहने जाळणाऱ्या एकास चंदनझिरा पोलिसांनी ताब्यात घेतल्याची घटना जालना शहरात घडली. आकाश राऊत असे आरोपीचे नाव असून त्यास जामवाडी येथील एका हाॅटेलमधून ताब्यात घेण्यात आले.
कन्हैय्यानगर भागात सोमवारी पहाटे २ वाजेच्या सुमारास स्कूटी, बुलेट, लोडिंग रिक्षा, प्लास्टिक टेबल कुणीतरी जाळल्याप्रकरणी शुभम रमेश शिंदे यांनी तक्रार दिली होती. या फिर्यादीवरून पोलिस निरीक्षक बाळासाहेब पवार यांनी गोपनीय सूत्र हलवले असता हा गुन्हा आकाश राऊत याने केला असल्याची माहिती मिळाली. दरम्यान, पवार यांनी पोलिस उपनिरीक्षक प्रमोद बोंडले, पोलिस हेड कॉन्स्टेबल वाघ, पोलिस कर्मचारी अनिल काळे, गोरख राठोड यांना सदर घटनेच्या आरोपीबाबत माहिती घेण्यासाठी आदेश दिले. दरम्यान, घटना घडण्याच्या वेळेतच राऊत हा फरार झाला होता.


तत्काळ या पथकाने जामवाडी येथील एका हॉटेल वरून ताब्यात घेऊन त्यास ताब्यात घेतले. ज्यांच्यासोबत भांडणे झाली, त्यांना मानसिक त्रास देण्यासाठी ही वाहने जाळत असल्याची कबुली दिली. यापूर्वी सुद्धा कन्हैय्यानगर येथील ५ ते ६ वाहने जाळल्याची कबुली दिली. दाखल गुन्ह्याचा पुढील तपास सहायक पोलिस उपनिरीक्षक पठाण करीत आहेत.
police arrested criminal who fires the vehicles

Post a Comment

 
Top