पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याविरोधात काँग्रेसने कट रचला अाहे, मुख्तार अब्बास नक्वी यांचा काँग्रेसवर आरोप.
रामपूर- पंतप्रधान नरेंद्र माेदी यांच्याविरोधात काँग्रेसने कट रचला अाहे. येत्या लोकसभा निवडणुकीत जनता काँग्रेसचा व्याजासह हिशेब करील, असे केंद्रीय अल्पसंख्याकमंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी मंगळवारी सांगितले.
अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त अायाेजित कार्यक्रमात नक्वी बाेलत हाेेते. ते म्हणाले, माेदींविराेधात देण्यात अालेल्या सुपारीला अाम्ही अामच्या चांगल्या कामांनी कापून काढू. २००४ च्या लोकसभा निवडणुकीत अटलबिहारी वाजपेयी यांच्या सरकारने कारगिलवर मिळवलेला विजय कमकुवत केला. त्या वेळी काँग्रेस अध्यक्षा साेनिया गांधी यांनी ‘कफन चाेर’चा प्रचार केला हाेता. तीच परंपरा राहुल गांधी पंतप्रधानांविराेधात खाेटा प्रचार व अाराेप करत अाहेत.
घटक पक्षांसंदर्भात अटलजींचा व्यवहार सकारात्मक हाेता
अटलबिहारी वाजपेयी यांचा घटक पक्षासंदर्भातील व्यवहार सकारात्मक हाेता. विराेधकांसंदर्भात त्यांची भूमिका उल्लेखनीय हाेती. मागील काही वर्षांमध्ये कोणत्याही राजकीय नेत्यास इतका सन्मान मिळाला नाही, असे बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी सांगितले.

Post a Comment