0


  • हिंगोली- जिल्ह्यातील औंढा नागनाथ येथे प्रेमीयुगलाचा संशयास्पद मृत्यु झाल्याचे समोर आले आहे. दोघांचे मृतदेह झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.

    मिळालेली माहिती अशी की, औंढा नागनाथ येथील गोकर्ण माळावर ही घटना घडली आहे. मृत प्रेमीयुगुलाची नावे अद्याप समजू शकली नाहीत. मृतदेह झाडाला लटकल्या अवस्थेत आढळून आले. परिसरामध्ये दुर्गंधी पसरल्याने ही घटना समोर आली. औंढा पोलिसांच्या माहितीनुसार हे दोन प्रेमीयुगल मागील शनिवारपासून त्याठिकाणी असल्याची माहिती समोर आली आहे.

Post a Comment

 
Top