ट्रॅक ओलांडत असाताना लोकांनी दिला होता आवाज पण झाला उशीर
जालंदर : येथे शनिवारी रेल्वेने धडक दिल्यामुळे एका युवतीचा मृत्यू झाला. प्रत्यक्षदर्शींनीच्या मते, मुलगी रेल्वे ट्रॅक क्रॉस करत असताना तिला आवाज दिला होता. आवाज ऐकून ती मागे फिरली पण तोपर्यंत रेल्वे तिला चिरडत निघून गेली. युवती एका कंपनीच्या इंटरव्ह्यूसाठी घरातून बाहेर पडली होती. या घटनेला आत्महत्येच्या दृष्टीकोनातून पाहण्यात येत आहे. पण घटनास्थळी कोणतीच सुसाइड नोट मिळलेली नाही. यामुळे ही दुर्घटना आहे की आत्महत्या याबाबत पोलिस संभ्रमात आहेत.
घरी परतत असताना मृत्यूने कवटाळले
दीप्ती प्रभाकर (वय 22 वर्ष) असे मृत युवतीचे नाव आहे. दीप्तीचे वडिल स्पेअर पार्टचे काम करतात. दीप्ती घरातून सकाळीच होंडा कंपनीत इंटरव्ह्यू देण्यासाठी निघाली होती. कुटुंबीयांनी सांगितले की, ती इंटरव्ह्यू दिल्यानंतर वेरका येथील मिल्क प्लांटजवळ राहणाऱ्या तिच्या आत्याकडे गेली होती. तेथून भगत सिंग कॉलनी येथील उड्डाणपूलाखालच्या रेल्वे ट्रॅकवरून जाणाऱ्या एका शॉर्टकटने येत असतांना ही दुर्घटना झाली.
लोकांनी दिला आवाज पण झाला उशीर
प्रत्यक्षदर्शींच्या मते, त्यांनी रेल्वे येताना पाहून दीप्तीला आवाज दिला होता. तिने मागे पाहताच रेल्वेच्या तावडीत सापडली आणि काही सेकंदातच तिच्या शरीराच्या चिंधड्या उडाल्या. तर दुसरीकडे काही लोक या दुर्घटनेला आत्महत्या असल्याचे सांगत आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, मुलीने मुद्दाम रेल्वेसमोर उडी घेतली. पण पोलिसांचे म्हणणे आहे की, घटनास्थळी कोणत्याही प्रकारची सुसाइड नोट मिळाली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मृतदेहाला शवविच्छेदनासाठी पाठवले होते.

Post a Comment