0
तेलंगणामध्ये विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेने प्रचारात आघाडी घेतली असून सर्व ठिकाणी मतदारांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे. तेलगंणा विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेकडून 40 ठिकाणी उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. 7 डिसेंबर रोजी मतदान होणार असून 18 डिसेंबर रोजी निकाल जाहीर होतील.
तेलंगणात 119 जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी शिवसेना पूर्ण ताकदीनिशी मैदानात उतरली आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशानुसार उमेदवारांच्या प्रचारासाठी सध्या रॅली आणि जोरदार बैठका सुरू आहेत. ठिकठिकाणी काढण्यात येणाऱया या रॅलींना सर्वसामान्य नागरिकांसह तरुणांचाही मोठा प्रतिसाद मिळत आहे. येथील उप्पल विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे उमेदवार म्हणून जगदीशभाई चौधरी हे निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारासाठी शिवसेना सचिव-खासदार अनिल देसाई यांच्या उपस्थितीत रविवारी हैदराबादमध्ये भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी प्रदेशाध्यक्ष टी. एन. मुरारी यांच्यासह हजारोंच्या संख्येने शिवसैनिक-पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

 
Top