0
मोदींचा हल्लाबोल आमच्या संरक्षण करारात क्वात्रोची मामा नसतात म्हणून काँग्रेस अस्वस्थ

नवी दिल्ली- रफाल करारातील कथित अनियमिततेची चौकशी करण्यास सुप्रीम कोर्टाने नकार दिल्यानंतर पेटलेला राजकीय वाद रविवारीही धुमसत राहिला. सर्वोच्च न्यायालयाने आपला निकाल मागे घ्यावा, अशी मागणी काँग्रेसने केली. दुसरीकडे, पंतप्रधान मोदी यांनी सोनिया गांधींच्या रायबरेली मतदारसंघात झालेल्या जाहीर सभेत काँग्रेसवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, 'भाजप सरकारने केलेल्या संरक्षणविषयक करारात क्वात्रोची मामा किंवा मिशेल अंकल नाहीत म्हणून काँग्रेस अस्वस्थ आहे. सतत खोटे आरोप करून न्यायपालिकेबद्दल अविश्वास निर्माण करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.'

रफालबाबत निकालानंतर मोदींनी प्रथमच काँग्रेसला घेरले. दुसरीकडे, काँग्रेसचे राज्यसभेतील उपनेते आनंद शर्मा यांनी म्हटले आहे की, रफाल करारावरील निकालात दुरुस्ती करण्यासंबंधी केंद्र सरकारने केलेली विनंती म्हणजे सुप्रीम कोर्ट आणि संसदेचा अवमान आहे.

संरक्षण क्षेत्रात भारताच्या क्षमता वृद्धीला काँग्रेसचा विरोध...
मोदी म्हणाले, अाज देशासमोर दोन बाजू आहेत. एक म्हणजे लष्कराची शक्ती वाढवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करणारे सरकार आणि दुसरीकडे देशाला कमकुवत करणाऱ्या राजकीय शक्ती. लष्कराला लंगडे करू पाहणाऱ्या लोकांच्या बाजूने काँग्रेसने शक्ती लावली आहे.

रामचरितमानस ऐकवून राहुलवर टीका :
'झूठई लेना, झूठई देना, झूठई भोजन, झूठ चबेना'... म्हणजे काही लोक असत्याचाच स्वीकार करतात, तेच इतरांना देतात, त्यांच्या भोजनातही तेच असते, असत्यच ते चघळत राहतात, असे सांगत मोदींनी राहुल गांधींचे नाव न घेता टीका केली. या लोकांना आता संरक्षण मंत्रालय, मंत्री, हवाई दलाचे अधिकारी, फ्रान्स सरकार सारेच खोटारडे वाटतात.

मोदी म्हणाले...
> न्यायाधीशांना धमकावण्याची काँग्रेसची जुनीच परंपरा लष्कराने २००९ मध्ये जवानांसाठी १.८६ लाख बुलेटप्रूफ जॅकेट मागितले होते. यूपीए-२च्या काळात ही खरेदी झाली नाही. २०१६ मध्ये एनडीएने ५० हजार जॅकेट खरेदी केले. शिवाय, एका देशी कंपनीला १.८६ लाख जॅकेटची ऑर्डर दिली.

> सर्वाधिक काळ सत्तेत राहिलेला हा पक्ष न्यायप्रणाली कमकुवत करू पाहत आहे. स्वार्थापुढे त्यांना देशहित किंवा लोकशाहीचेही महत्त्व वाटत नाही. न्यायाधीशांना धमकावण्याची काँग्रेसची जुनी परंपरा आहे.

काँग्रेसने दलालाचाही कोर्टात वकील पाठवून बचाव केला
मोदी म्हणाले, बोफोर्स घोटाळ्यातील क्वात्रोची मामा म्हणजे काँग्रेसचा इतिहास आहे. हेलिकॉप्टर घोटाळ्यात क्रिश्चियन मिशेल याला काही दिवसांपूर्वी भारतात आणले. त्याला वाचवण्यासाठी काँग्रेसने आपले वकील कोर्टात पाठवले.

केंद्राला दिली हाेती कोर्टाने क्लीन चिट
कॅगच्या चौकशीस सदस्यांचा विरोध रफाल वादानंतर अॅटर्नी जनरल तसेच कॅगला संसदेच्या लोकलेखा समितीसमोर पाचारण केले जाण्याची शक्यता धूसर होत आहे. समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी शनिवारी अशा चौकशीचेे संकेत दिले होते. मात्र, समितीच्या बहुतांश सदस्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे विरोध दर्शवला.

Post a comment

 
Top