0
रुही बेर्डेंचा यशात होता मोठा...

मुंबईः आपल्या अचुक कॉमिक टायमिंगने लक्ष्मीकांत बेर्डे यांनी प्रेक्षकांना खळखळून हसवले होते, तर काही काही चित्रपटांमधून प्रेक्षकांना रडवलेदेखील. मराठीतच नव्हे तर हिंदीतही आपल्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवली. 16 डिसेंबर, 2004 मध्ये त्यांचे निधन ढाले. त्यांना या जगाचा निरोप घेऊन जवळजवळ 14 वर्षे झाली आहेत. पण कलाकृतींच्या माध्यमातून ते आजही आपल्यातच आहेत. मध्यमवर्गीय कुटूंबात जन्मलेल्या लक्ष्मीकांत यांना बालपणापासूनच अभिनयाची आवड होती. चाळीत त्यांचे बालपण गेले. त्यांनी दोन लग्न केले होते. पहिल्या पत्नीला घटस्फोट न देताच ते त्यांच्यापासून वेगळे झाले होते.

लक्ष्मीकांत बेर्डे यांनी केले होते दोनदा लग्न...
- लक्ष्मीकांत बेर्डे हे केवळ एक अभिनेता नसून ती एक जादू होती. 26 ऑक्टोबर 1954 रोजी त्यांचा जन्म झाला होता.
- त्यांचे पहिले लग्न रुही बेर्डेसोबत झाले होते. पण काहीच वर्षे दोघांचा संसार टिकला.
- अभिनेत्री प्रिया बेर्डेंसोबत लक्ष्मीकांत यांनी दुसरे लग्न केले. या जोडीने अनेक मराठी चित्रपटात एकत्र काम केले होते. तसेच हिंदी चित्रपटातसुद्धा हे दोघे एकत्र झळकले होते.
- अभिनय आणि स्वानंदी ही प्रिया-लक्ष्मीकांत यांच्या मुलांची नावे आहेत. अभिनयने ती सध्या काय करते या चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पदार्पण केले आहे. तर धाकटी मुलगी स्वानंदी 17 वर्षांची असून तिचे महाविद्यालयीन शिक्षण सुरु आहे.

रुही बेर्डेंचा यशात होता मोठा...
- एका मुलाखतीत प्रिया बेर्डे यांनी लक्ष्मीकांत आणि रुही यांच्याविषयी सांगितले होते, की "लक्ष्मीकांत यांच्या यशात सर्वोत मोठा वाटा हा रुही बेर्डेंचा होता. जेव्हा लक्ष्मीकांत प्रसिद्ध नव्हेत, त्याकाळात रुही यांनी त्यांना साथ दिली होती.

लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या आयुष्यातील काही महत्त्वाच्या गोष्टी
- लक्ष्मीकांत यांनी करिअरची सुरुवात रंगभूमीवर केली होती. लक्ष्मीकांत बेर्डेंचा अभिनय आधीपासूनच चित्तवेधक होता. सार्वजनिक गणेशोत्सवामधील सांस्कृतिक कार्यक्रमांत त्यांचा सहभाग असे.
- लक्ष्मीकांत यांनी आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन अभिनय स्पर्धांमध्ये पारितोषिके पटकावली होती.
- शिक्षण संपल्यावर लक्ष्मीकांत यांनी मुंबई मराठी साहित्य संघाकडून सोबत व्यावसायिक नाट्यसृष्टीत पदार्पण केले. 1983-84 मध्ये त्यांनी पुरुषोत्तम बेर्डे यांच्या "टूर टूर" ह्या नाटकामधे प्रमुख भूमिका साकारली आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली.
- 'टुरटुर' हे त्यांचे पहिलेच नाटक जबरदस्त हिट ठरले होते. त्यानंतर आलेले 'शांतेचे कार्ट चालू आहे', 'बिघडले स्वर्गाचे द्वार', 'कार्टी चालू आहे' ही नाटकेही यशस्वी ठरली.
- लक्ष्मीकांत यांनी 1985 मध्ये 'लेक चालली सासरला' या सिनेमाद्वारे मोठ्या पडद्यावर पदार्पण केले. त्यांचे आलेले धुमधडाका (1985), अशी ही बनवाबनवी (1988), थरथराट (1989) सह अनेक सिनेमे प्रचंड लोकप्रिय ठरले.
- अशोक सराफ, महेश कोठारे आणि सचिन पिळगावकर यांच्यासोबतचे लक्ष्मीकांत यांचे ट्युनिंग कमालीचे होते.
- सूरज बडजात्या दिग्दर्शित 'मैंने प्यार किया' या सिनेमाद्वारे त्यांनी 1989 मध्ये हिंदी सिनेसृष्टीत यशस्वी पदार्पण केले.
- लक्ष्मीकांत यांनी विनोदी व्यक्तिरेखा साकारलेले साजन (1991), बेटा (1992) आणि हम आपके है कौन (1994) हे हिंदी सिनेमे खूप गाजले.
- लक्ष्मीकांत बेर्डे शिस्तप्रिय होते. रात्री कितीही उशीरा झोपले, तरी सकाळी वेळेत ते सेटवर हजर असायचे.
- 9 च्या शिफ्टला ते वेळेवर सेटवर हजर असायचे. लक्ष्मीकांत यांचा शॉट आहे म्हटल्यावर त्यांच्या हिरोईन्ससुद्धा वेळेत सेटवर हजर असायच्या.
- प्रिया बेर्डेंनी सांगितले, की लक्ष्मीकांत अतिशय मनस्वी होते. कामावर त्यांची खूप श्रद्धा होती.
- 'एक होता विदुषक'च्या अपयशामुळे लक्ष्मीकांत बेर्डेंचे खचून गेले होते. त्या चित्रपटाच्या अपयशाच्या दुःखातून ते शेवटपर्यंत बाहेर पडू शकले नाहीत, असे प्रिया यांनी मुलाखतीत सांगितले होते.
- लक्ष्मीकांत बेर्डे उत्कृष्ट गिटारवादक होते, हे फार कमी जणांना ठाऊक आहे.
- विनोदाचे अत्यंत अचुक टायमिंग असणा-या या अभिनेत्याने 16 डिसेंबर 2004 रोजी या जगाचा कायमचा निरोप घेतला. मूत्रपिंडाचा विकाराने वयाच्या 50व्या वर्षी लक्ष्मीकांत बेर्डेंचे निधन झाले होते.
Laxmikant Berde Unknown Facts: death anniversary

Post a Comment

 
Top