शहरालगत असलेल्या राष्ट्रीय महामार्गाशेजारी तुरूकमट्टी येथील माळरानाला शुक्रवारी दुपारी 1 च्या सुमारास आग लागली. कडाक्मयाचे उन असल्याने आग क्षणार्धात संपूर्ण परिसरात पेटली. यामुळे महामार्गावर धूराचे लोळ पसरले होते. अग्निशमन व लष्कराच्या जवानांनी तब्बल तीन तासांच्या अथक परिश्रमानंतर आग आटोक्मयात आणली.
सध्या लष्कराच्या ताब्यात असलेल्या या भागात वणवे टाकण्याचे प्रमाण वाढले आहे. काही विघ्नसंतोषी नागरिकांकडून अशाप्रकारे वणवे टाकण्यात येत आहेत. गवत सुकले असल्याने ते क्षणार्धात भस्मसात होत आहे. अशीच आग या परिसरात दुपारच्या सुमारास लागली. आगीने काही क्षणातच रौद्र रूप धारण केले. यामुळे महामार्गावर धुराचे लोळ येत होते. या आगीची झळ आसपासच्या परिसरालाही बसली.
याची माहिती मिळताच अग्निशमन विभागाचे दोन टँकर घटनास्थळी दाखल झाले. परंतु आग लागलेल्या ठिकाणापर्यंत टँकर जाणे शक्मय नसल्याने दूरूनच पाण्याचा फवारा मारावा लागत होता. तब्बल 3 तासानंतर ही आग आटोक्मयात आली. परंतु यामध्ये 600 एकर पैकी अधिकतर गवत व झाडे आगीत जळून खाक झाली आहेत.
व्ही. एस. टक्केकर (केंद्र अग्निशमन अधिकारी)
गवत सुकले असल्याने वणवे लागण्याचे प्रमाण वाढले आहे. दुपारच्या सुमारास ही आग लागल्याने आटोक्मयात आणण्यास काही वेळ लागला. तसेच जंगल भागात टंकर घेऊन
जाणे शक्मय नसल्याने जवानांना इतर साहित्यानी ही आग आटोक्मयात आणावी लागली

Post a Comment